Join us

चिकूची लागवड करताय? हे माहित असू द्या

By बिभिषण बागल | Published: September 08, 2023 12:15 PM

भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते.

मध्यम प्रतीच्या उत्तम निचरा होणाऱ्या व बारमाही पाण्याची सोय असलेल्या जमिनीत चिकू लागवड करता येते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते.

'कालीपत्ती' या जातीच्या झाडाची पाने गर्द हिरव्या रंगाची व फळे अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून, गर गोड असतो. फळे भरपूर लागतात. 'क्रिकेटबॉल' या जातीपासून मोठी गोलाकार फळे मिळतात. गर कणीदार असतो. मात्र, गोडी कमी असून फळे चवीला कमी असतात; मात्र फळे भरपूर लागतात. "छत्री' या झाडाच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते. पाने फिकट हिरव्या रंगाची असतात. फळाचा आकार 'कालीपत्ती'च्या फळांप्रमाणे असतो. परंतु गोडी कमी असते.

चिकूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत शेतातील झाडे झुडपे काढून शेत स्वच्छ करावे. कलमे लावण्यासाठी दहा बाय दहा मीटर अंतरावर एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. हे खड्डे चांगली माती, तीन ते चार घमेली शेणखत व २.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. वाळवीचा उपद्रव टाळण्यासाठी रिकाम्या खड्डयात चिकू हे सिंचनाखालील पीक असल्याने याची लागवड अतिपावसाळा सोडून वर्षभरात कधीही करता येते.

सुरुवातीच्या दोन वर्षांत कलमाच्या खुंटावरील वारंवार येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी लागवडीपासून तीन वर्षे कलमावरील फुले खुडून काढावीत. कलमांची पूर्ण वाढ होण्यास आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षांच्या कालावधीत चिकूच्या लागवडीमध्ये आंतरपिके म्हणून भाजीपाला, अल्पायुषी फळझाडे, फुलझाडे किंवा द्विदल धान्य घेता येतात.

पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात विभागून देणे आवश्यक आहे. पहिला हप्ता जानेवारीमध्ये द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाच्या मात्रेच्या दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे खताचे प्रमाण २० वर्षांपर्यंत वाढवीत जावे. त्यानंतर दरवर्षी २० घमेली शेणखत, सहा युरिया, १८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत.

पाणी व्यवस्थापन: हिवाळ्यात आठ व उन्हाळ्यात पाच दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल, साठून राहणार नाही अशी योजना करावी. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कोकण विभागात जुन्या घनदाट चिकूच्या मिळवण्या अधिक उत्पन्न ऑक्टोबरमध्ये मधल्या मुख्य फांदीची छाटणी व विरळणी करावी. तझेच झाडाची सर्व बाजूंनी एक मीटर छाटणी करावी. कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कृ षीसेवकांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कीटकनाशक फवारणी करावी.

टॅग्स :फळेपीकशेतकरीशेतीपाणीखते