सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी खालील वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.
सुरू हंगामासाठी उसाचे वाण
१) को.८६०३२ (निरा)
- या वाणाचे एकरी ७५ टनापेक्षा अधिक उत्पादन सुरू हंगामात शेतकरी घेत आहेत. सन १९९६ मध्ये प्रसारित केलेला हा वाण साखर कारखाना आणि शेतकरी यांच्या पसंतीस पडला आहे.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १०६.००
साखर- १४.४४
२) को.एम.०२६५ (फुले-२६५)
- को.८६०३२ पेक्षा २० ते २५ टक्के जादा उत्पादन, क्षारयुक्त व चोपण जमिनीत इतर वाणांपेक्षा १४ महिन्यात अधिक उत्पादन हमखास मिळते.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १५०.००
साखर- २०.३१
३) को.९२००५ (फुले ९२००५)
- कोल्हापूर जिल्ह्यात या वाणाचे अपेक्षित उत्पादन मिळते.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १२८.६९
साखर- १४.२१
अधिक वाचा: जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय?
४) एम.एस.१०००१ (फुले १०००१)
- लवकर साखर तयार होणारा, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, क्षारपड जमिनीसाठी योग्य असलेला वाण
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १३२.८२
साखर- १९.३१
५) को.एम. ९०५७ (फुले ९०५७)
- गुळाचे उत्पादन अधिक मिळते. साखर उतारा चांगला असून उत्पादन तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. उसाचे वजन चांगले असून फूट कमी असल्याने जवळ लागवड करावी. गुळाचे उत्पादन अधिक मिळते.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
गुळ- १३२.८२
साखर- १९.३१
६) फुले ११०८२
- नवीन वाण सुरू हंगामासाठी उत्तम, लवकर साखर तयार होणारा, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोगप्रतिकारक.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- ११३.०८
साखर- १५.७७
७) फुले १५०१२
- नवीन वाण तीनही हंगामासाठी उत्तम, मध्यम पक्वता अधिक ऊस व साखर उतारा, उत्तम खोडवा, पाचट गळून पडते.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १३०.३८
साखर- १८.७७
८) फुले १४०८२
- नवीन वाण सुरू हंगामासाठी उत्तम, पाण्याचा ताण सहन करणारा वाण, मध्यम पक्वता उष्ण कटिबंधासाठी शिफारस, अधिक ऊस व साखर उत्पादन.
- सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस- १२८.६०
साखर- १७.५८
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र
पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा