Join us

Daisy Flower: युवा दाम्पत्याने शेतात चमकली 'या' फुलांची 'बिजली'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:15 IST

Daisy Flower: सोनेगाव लोधी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या मांगली या लहानशा खेड्यातील दुर्गेश व मंगला वाघमारे या युवा दाम्पत्याने बिजली (डेझी) (Daisy Flower) या फुलाची शेतात लागवड (Cultivation) करून भरघोस उत्पादन घेतले.

विनोदकुमार डांगरे

सोनेगाव लोधी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या मांगली या लहानशा खेड्यातील दुर्गेश व मंगला वाघमारे या युवा दाम्पत्याने (Young Couple) बिजली (डेझी) (Daisy Flower) या फुलाची शेतात लागवड (Cultivation) करून भरघोस उत्पादन घेतले.

त्यांच्या शेतावर भेट दिली असता जणू त्यांच्या शेतात बिजली (Daisy Flower) चमकली असे मनोहारी दृश्य पाहायला मिळते. ९० दिवसांच्या कालावधीत त्यांना २.४० लाखांचे भरघोस उत्पादन झाले आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील दुर्गेश यांचे शिक्षण बी.ए. झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून वाघमारे दाम्पत्य दोन एकर शेतजमिनीत आळीपाळीने फुलशेतीची लागवड करीत आहे.

बिजली (डेझी) हे ९० दिवसांचे पीक आहे. त्यातील ६० दिवस झाल्यानंतर फुल तोडणीला येते. फुल तोडणीच्या काळात दुर्गेश पहाटे चार वाजता नागपूरच्या मार्केटला फुले घेऊन जातात.

४५ किलोमीटरचा त्यांचा हा प्रवास स्वतः च्या दुचाकीवरून असतो. दर पाच दिवसांनी पाच-सहा क्विंटल फुलाचे उत्पादन त्यांना होत आहे. सरासरी किलोमागे ४० रुपये भाव, याप्रमाणे एका बिजली (डेझी) फुलशेतीची पाहणी करताना कृषी अधिकारी व शेतकरी दुर्गेश वाघमारे.

२ लाख उत्पादन रुपये निव्वळ नफा

* तोड्याला २० हजार रुपये नुसार त्यांना फक्त तीन महिन्यांत एकरी १ लाख २० हजार याप्रमाणे दोन एकरांत २.४० लाख रुपयांचे उत्पादन झाले.

* लागवड व इतर खर्च एकरी २० हजार रुपये झाला. त्यानुसार ४० हजार रुपयांचा खर्चवजा जाता दोन एकरांत त्यांना दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यातून त्यांनी ग्रामीण शेतकऱ्यांसमोर उन्नतीचा आदर्श नमुना ठेवला आहे.

* कृषी विभागाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी कीड व रोगांपासून फुलाचा बचाव केला आहे. मात्र, भाव पडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत वाघमारे यांनी व्यक्त केली.

कृषी अधिकाऱ्यांनी दिली भेट

कृषी विभागाच्या वतीने नुकतेच मांगली येथे शेतीशाळा व प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी मनीषा थेरे, मंडळ कृषी अधिकारी युवराज चौधरी, कृषी पर्यवेक्षक लता टोंगलवार आणि कृषी सेवक प्रशंशा नाईक व शिवम कदम यांनी त्यांचे फुलशेतीला भेट देऊन पाहणी केली व कष्टाळू वाघमारे दाम्पत्याचे अभिनंदन करून कौतुक केले.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीफुलंशेतकरीशेती