Dal Production : डाळी हा प्रकार भारतात लोकप्रिय आहे. भारतीयांच्या रोजच्या जेवणात डाळीचा समावेश असतो. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. देशातील डाळींचे उत्पादन घेणारी टॉप ५ राज्ये कोणती आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
भारतात तांदुळ आणि गहू, ज्वारी, नाचणी, बाजरीसह कडधान्ये आणि डाळींचे देखील उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. डाळींचे उत्पादन देशातील पाच प्रमुख राज्यात होते. डाळींमधून चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळत असते.
कृषि मंत्रालयाने देशातील सर्वात जास्त डाळींचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. भारतातील पाच टॉप डाळींचे उत्पन्न घेणारी राज्यांचा वाटा एकूण डाळींच्या उत्पादनात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामध्ये देशातील तीन राज्ये अशी आहेत. ज्यांचा डाळीच्या एकूण उत्पादनात ५६.४ टक्के वाटा आहे.
या राज्यात होते डाळींचे सर्वाधिक उत्पन्न
कृषी मंत्रालयाने २०२३-२४ या आर्थिक वर्षेत डाळींच्या उत्पादनाचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात सर्वात जास्त डाळींचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात मध्य प्रदेश अग्रेसर आहे.
* मध्य प्रदेशात सर्वाधिक डाळींचे उत्पादन घेतले जाते. अहवालानुसार देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण डाळीच्या उत्पादनाचा एक चतुर्थांश वाटा मध्य प्रदेशाचा आहे.
* देशात महाराष्ट्र डाळ उत्पन्न घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षेत सुमारे ४ हजार किलोग्रॅम डाळीचे उत्पादन झाले होते. जे देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या सुमारे १६.३ टक्के आहे.
* डाळीच्या उत्पादन घेण्यात राजस्थान देखील मागे नाही. राजस्थान मागील आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये सुमारे ३६६० किलोग्रॅम डाळीचे उत्पादन झाले होते. जे एकूण डाळ उत्पादनाच्या १४.८ टक्के आहे.
डाळ उत्पादनात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मागे नाही
डाळीचे उत्पन्न घेणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान शिवाय उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्याचा देखील समावेश झाला आहे. कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डाळ उत्पन्नात उत्तर प्रदेशाचा क्रमांक चौथा आहे. तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. कर्नाटकात सुमारे ९ टक्के डाळीचे उत्पादन होते. त्यामुळे डाळ उत्पादनात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्य मागे नाहीत.