Join us

Dalimb Cluster Solapur : सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्लस्टरसाठी दोनशे नव्वद कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:39 AM

डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, क्लस्टरसाठी २९० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

सोलापूर : डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, क्लस्टरसाठी २९० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

कृषी सचिवांशी याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, दोन दिवसांत क्लस्टरसंदर्भात सचिवांसोबत बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापुरात डाळिंब उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबसंबंधित पूरक व्यवसाय, तसेच उत्पादने वाढवण्यासाठी क्लस्टर योजना महत्त्वाची आहे. येथील उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर क्लस्टर योजना आवश्यक असल्याची माहिती मिळाली.

विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात क्लस्टर योजना राबवू, त्यानंतर दुसऱ्या वर्षी शंभर कोटी रुपये खर्चुन कृषी पर्यटन उभारण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला कृषी सचिवांशी चर्चा होईल. त्यानंतर कृषी आयुक्तांसोबत बैठक होईल.

दोघांची परवानगी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण करू. यातून डाळिंब उत्पादकांना मार्केटिंगसोबत आधुनिक यंत्रसामग्रीबाबत क्लस्टरमध्ये प्रशिक्षण मिळेल.

जेणेकरून डाळिंब उत्पादकांना जागतिक बाजारपेठांमध्ये जाता येईल. डाळिंब शंभर रुपये किलो दराने विकत असतील, तर प्रोसेसिंग करून डाळिंब ज्यूस बनविल्यास ज्यूसची तीनशे रुपये किलो दराने विक्री होईल. म्हणजे आहे त्या उत्पादनात किलोमागे संबंधित शेतकऱ्यास दोन रुपयांचा फायदा होणार आहे.

डाळिंब उत्पादकांची संख्या वाढणारक्लस्टर सुरू झाल्यानंतर डाळिंब उत्पादकांची संख्यादेखील वाढणार आहे. सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, तसेच पंढरपूर परिसरात डाळिंब उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना या क्लस्टरचा फायदा होईल, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

अधिक वाचा: Sugar Industry in Maharashtra : भविष्यामध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योग कसा असू शकेल वाचा सविस्तर

टॅग्स :डाळिंबसोलापूरशेतकरीशेतीराज्य सरकारसरकारपर्यटनकाढणी पश्चात तंत्रज्ञानफलोत्पादन