Join us

Dast Nondani: मार्चअखेरीस सुट्टीच्या दिवसांतही होईल राज्यभर दस्तनोंदणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:27 IST

Dast Nondani : रेडिरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के दरवाढ होत असल्याने खरेदी-विक्री व्यवहारासाठी (registration) दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यातच मार्चअखेरीस तीन दिवस सुट्या आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहतील. (Dast Nondani)

Dast Nondani : रेडिरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के दरवाढ होत असल्याने खरेदी-विक्री व्यवहारासाठी (registration) दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यातच मार्चअखेरीस तीन दिवस सुट्या आहेत. (Dast Nondani)

त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये २९, ३० व ३१ मार्च रोजी सुरू राहतील, तसे आदेश नोंदणी (registration) महानिरीक्षकांनी सोमवारी (२४ मार्च) रोजी दिले आहेत. (Dast Nondani)

नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे. महसूल वसुलीत हा विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात जनतेच्या स्थावर मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी (registration) केली जाते व त्याचे अभिलेख सुरक्षित केले जातात. या विभागाने मागील वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला.

'या' दिवशी सुरू राहणार कार्यालय

* मार्च महिन्याच्या शेवटी २९ ते ३१ तारखेला सार्वजनिक सुट्या येत आहेत. त्यामुळे या दिवशी जनतेची गैरसोय होऊ नये व त्यांना दस्तनोंदणी सहज करता यावी.

* यासाठी नोंदणी महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व नोंदणी कार्यालये २९, ३० व ३१ मार्च २०२५ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागस यंदा ६० हजार कोटींचे लक्ष्य दिले आहे.

अनेक सुट्यांच्या दिवशी या विभागातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे. आताही सर्व अधिकारी, कर्मचारी महसूल वृद्धीसाठी सेवा देतील. नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी करावी. - अनिल भा. औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी, अमरावती व वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजमीन खरेदी