राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अवेळी पावसामुळे नाशिक विभागात ७३ हजार ५६७ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. अमरावती विभागातील २१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे १ लाख ३८ हजार २५३ हेक्टरवर नुकसान झाले. महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक विभागातील नुकसानीपोटी १०८ कोटी २१ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अमरावती विभागातील नुकसानीपोटी ३८२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
नागपूर विभागातील ३ लाख ५४ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या २ लाख १७ हजार ६९० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. त्यांना १०० कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
पीक कर्जाची वसुली बँकांनी करू नये
पुणे विभागात २ हजार २९७ शेतकऱ्यांचे १६५७ हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यांना ५ कोटी ८३ लाखांची मदत दिली जाणार आहे. नागपूर आणि अमरावती विभागामुळे ४८२ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बैंक खात्यात जमा केली जाईल.