Lokmat Agro >शेतशिवार > खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

Demand for Fertilizers in kharif season; Use of urea will increase | खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरिपात खतांची मागणी; युरियाचा वापर वाढणार

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते व बियाण्यांची बेगमी करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खताची १ लाख ४९ हजार टनाची मागणी असून, १० हजार १०६ टन आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गडहिंग्लज विभागासह गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडी तालुक्यात युरिया वापर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

खरिपाचे क्षेत्र घटले असले तरी बियाण्यांची मागणी मात्र कायम ठेवली आहे. जिल्ह्यासाठी भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीनसह कडधान्यांचे ३७ हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. गेल्या हंगामात आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा व हातकणंगले तालुक्यात युरियाचा वापर मागणीपेक्षा अधिक झाल्याचे दिसते.

खरीप हंगामातील पिकांसह उसासाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जूनच्या पहिल्या पंधरवड्यात खतांची मागणी वाढते. यंदा युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांची १ लाख ४९ हजार टनाची मागणी केली आहे. सर्वाधिक मागणी ६२ हजार ८०० टनाची संयुक्ती खतांची केली आहे.

आतापर्यंत केवळ ७ टक्केच खते उपलब्ध झाली असली तरी आगामी पंधरा दिवसांत आवक वाढणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा ३७ हजार ७७१ क्विंटलची गरज आहे. त्यानुसार विभागाने तयारी केली असून, सर्वाधिक २३ हजार ९४० क्विंटल बियाणे भाताचे लागणार आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन व भुईमुगाचे बियाण्यांची गरज राहणार आहे.

यंदा २३ खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित
कृषी विभागाच्या वतीने खते, बियाणे, कीटकनाशकांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. गेल्या वर्षभरात या पथकाने छापे टाकून व शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर त्रुटी आढळलेल्या २३ खतविक्रेत्यांचे परवाने निलंबीत केले आहेत. गेल्या वर्षी चौघांचे परवाने रद्द तर चौघांचे निलंबन केले होते.

खताची मागणी व पुरवठा (क्विंटलमध्ये)

खतमागणीएप्रिलपासूनचा पुरवठा
युरिया४९ हजार ८००४ हजार १७१
एमओपी९ हजार-
एसएसपी१३ हजार ५००४४३
डीएपी१३ हजार ९००१ हजार २००
संयुक्त खते६२ हजार ८००४ हजार ७९२

अधिक वाचा: Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले

Web Title: Demand for Fertilizers in kharif season; Use of urea will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.