Join us

Deshi Cow : राज्य सरकारचा मोठा निर्णय! देशी गायी आता 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:38 PM

Deshi Cow : या निर्णयामुळे देशी गायींच्या संवर्धनास आणि वाढीस चालना मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. देशी गायीचे महत्त्व भारतीय शेतीसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Maharashtra : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला असून देशी गायीला "राज्यमाता-गोमाता" म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशी गायींच्या संवर्धनास आणि वाढीस चालना मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. देशी गायीचे महत्त्व भारतीय शेतीसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना "कामधेनू" असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठया प्रमाणात घट होत आहे.

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. I

देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे "राज्यमाता-गोमाता" म्हणून घोषीत करण्यात आले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगाय