मिरची हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे. जसं अन्नाला गोडवा येण्यासाठी साखरेचे उपयोग होतो तसेच जेवनातील तिखटपणा येण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. या मिरचीचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. त्यामध्ये ढोबळी मिरची, लवंगी मिरची, वेगवेगळ्या रंगाची मिरची अशा मिरच्यांचा सामावेश असतो दिवसेंदिवस देशी मिरचीचे अनेक नवे वाण विकसित केले जात आहेत. पण आपल्याला देशी वाणाची सव्वा फूट लांब वाढणारी मिरची माहिती आहे का?
दरम्यान, देशी वाणाच्या या मिरचीला जव्हारी मिरची असंही संबोधलं जातं. तर विशेष म्हणजे या मिरचीची लांबी एक ते सव्वा फूटापर्यंत असते. या मिरचीची लांबी हेच तिचे आकर्षण आहे. तर ही मिरची खायला मध्यम तिखट असते. त्याचबरोबर बासमती तांदुळाला ज्याप्रकारे सुगंधित वास असतो त्याप्रमाणे या मिरचीला विशिष्ट वास असल्यामुळे या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
किती मिळते उत्पादन?
या मिरचीची लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यानंतर मिरच्यांचे उत्पादन सुरू होते. हायब्रीड किंवा संकरित वाणांपेक्षा कमी उत्पादन या मिरचीचे होते पण दर चांगला मिळतो. याच मिरचीचे बियाणे पुढच्या वेळी लागवडीसाठी वापरता येऊ शकतात.
किती मिळतो दर?
ही मिरची सव्वा फूट लांब असल्यामुळे तिचे आकर्षण जास्त आहे. तर वाळलेल्या मिरचीला ७०० रूपये ते १ हजार ५०० रूपये किलोप्रमाणे दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ही मिरची फायद्याची ठरते. या मिरचीचा देशी वाण असल्यामुळे शेतकरी त्यामध्ये करत नाहीत.
माहिती संदर्भ - अनिल गवळी (देशी बियाणे संवर्धन करणारे शेतकरी, मोहोळ जि. सोलापूर)