Lokmat Agro >शेतशिवार > १०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित

१०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित

Developed a variety of lotus with 108 petals | १०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित

१०८ पाकळ्या असलेल्या कमळाची जात विकसित

‘एनबीआरआय नमोह १०८’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे.

‘एनबीआरआय नमोह १०८’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लखनौ इन्स्टिट्यूट सीएसआयआर-एनबीआरआय (नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ने विकसित केलेल्या "कमळ" फुलाच्या १०८ पाकळ्या असलेल्या नवीन जातीचे अनावरण केले. ‘एनबीआरआय नमोह १०८’ नावाचे कमळ सीएसआयआर या लखनौमधील वनस्पती विज्ञान संशोधन बहुविद्याशाखीय अत्याधुनिक अशा राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने विकसित केले आहे. ह्या नव्या जातीचे आणि एनबीआरआय च्या नव्या उत्पादनांचे राष्ट्रार्पण करतांना, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “कमळ फुलाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, ही नवी जाती, या फुलाला विशेष ओळख देणारी ठरली आहे.”

नमोह १०८ कमळ जातीची फुले मार्च ते डिसेंबर या महिन्यात फुलतात आणि यात खूप जास्त पोषक मूल्ये आहेत. हे कमळाचे पहिलेच असे वाण आहे, ज्याची संपूर्ण जनुक क्रम रचना, त्याच्या वैशिष्ट्यांसाठी करण्यात आली आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी कमळाच्या तंतूपासून तयार केलेले वस्त्र आणि फुलांचा सुगंधी अर्क काढून बनवलेले 'फ्रोटस' ह्या अत्तराचेही अनावरण केले. हे अत्तर एनबीआरआयने एफएफडीसी, कन्नौजच्या सहकार्याने कमळ संशोधन कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे.

ह्या नव्या वाणाला, ‘नमोह १०८’ असे अभिनव नाव दिल्याबद्दल एनबीआरआयचे कौतुक करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षीही नरेंद्र मोदी यांचे अथक कार्य आणि त्यांच्या परिश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सुंदर सुगंधी भेट आहे.

यावेळी कमळ अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. “हा प्रकल्प इतर प्राधान्य योजनांप्रमाणे मिशन मोडमध्ये हाती घेतला जात आहे - राष्ट्रीय मध आणि मधमाशी अभियान (NHBM), राष्ट्रीय बांबू अभियान (NBM), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF), राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA), गोकुळ अभियान, नील क्रांती, शक्ती अभियान - एकीकृत महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि आंतरशाखीय सायबर- प्रत्यक्ष व्यवस्थाविषयक राष्ट्रीय अभियान, अशा सर्व अभियांनाप्रमाणेच हे अभियानसुद्धा पूर्ण कार्यक्षमतेने राबवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारने, आता अरोमा मिशनच्या यशानंतर, हे लोटस अभियान सुरू केले आहे. आपले सरकार केवळ अभियान, योजना किंवा प्रकल्प सुरू करत नाही, तर त्यांची निर्धारित वेळेत अंमलबजावणी पूर्ण होईल, हे ही सुनिश्चित करते, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आहे,” असे ही जितेंद्र सिंह म्हणाले. यावेळी पुनर्वापराच्या दुसर्‍या अभिनव उपक्रमात, डॉ. जितेंद्र सिंग यांनी विविध कामांसाठी लागणाऱ्या नैसर्गिक रंगांचेही अनावरण केले. मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या फुलांच्या निर्माल्यातून एनबीआरआय’ने हे नैसर्गिक रंग तयार केले आहेत. या हर्बल रंगांचा वापर रेशीम आणि सुती कापडासाठी देखील केला जाऊ शकतो.

“एनबीआरआय-निहार’ नावाच्या कोरफडीच्या नवीन जातीचेही अनावरण
डॉ. सिंह यांनी “एनबीआरआय-निहार’ नावाच्या कोरफडीच्या नवीन जातीचेही अनावरण केले. ही कोरफड साधारण कोरफडीच्या तुलनेत अंदाजे अडीचपट जास्त जेलचे उत्पादन करते.  प्रात्यक्षिकानुसार 'एनबीआरआय-निहार' कोरफड जिवाणू आणि बुरशीजन्य रोगांवर सर्वात कमी प्रभावित असल्याचे आढळले आहे. सामान्य खोकला आणि सर्दी बरी करण्यासाठी ‘हर्बल कोल्ड ड्रॉप्स’ आणि मार्क लॅबोरेटरीजने बनवलेले हर्बल अँटी डँड्रफ हेअर ऑइल या दोन हर्बल उत्पादनांचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Developed a variety of lotus with 108 petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.