Lokmat Agro >शेतशिवार > Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

Did you get 5000 thousand of cotton and soybean crops? Check online on your mobile | Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

Cotton Subsidy : कापूस व सोयाबीन पिकांचे ०५ हजार मिळाले का? ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईलवर

Kapus Soybean Anudan : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य  देण्यात येत आहे.

Kapus Soybean Anudan : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य  देण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton , Soyabean Subsidy : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत आहे.

परळी (जि. बीड) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टलचे अनावरण झाले.

गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.

त्यानुसार किमान एक हजार रुपये, तर दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा हजार रुपये याप्रमाणे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण ४ हजार १९४ कोटी रुपये ६८ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यातील १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस, तर २ हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही ऑनलाईन कशी चेक कराल? 
१) पुढील अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा. https://scagridbt.mahait.org
२) सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती लाल चौकोनात Disbursement Status वर क्लिक करा.
३) पुढे गेल्यावर Disbursement Status पेज दिसेल त्यात तूंच आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करा.
४) त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

Web Title: Did you get 5000 thousand of cotton and soybean crops? Check online on your mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.