Lokmat Agro >शेतशिवार > एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम

एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम

Different types of mangoes are available in different markets of the state | एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम

एकापेक्षा एक सरस आंब्याची राज्याच्या विवीध बाजारात धूम

बाजारातील आंब्यात गावरान आंब्यांची चव मात्र दुर्मिळ

बाजारातील आंब्यात गावरान आंब्यांची चव मात्र दुर्मिळ

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिऊरकर 

फळांचा राजा आंबा हे भारतीयांच्या उन्हाळ्याचे प्रतीक आहे. त्यातही आपल्याकडील पारंपरिक आंबा म्हणजे चवच भारी. पण, दुर्दैवाने अलीकडे आपल्याकडील देशी (गावरान) भारतीय आंबा त्याच्या अद्वितीय चव आणि पोत पासून दुर्मिळ होत आहे.

चवीला गोड, अल्प रसाळ गावरान आंब्याची जागा आता संकरित आणि परराज्यातून आयात केलेल्या विविध आकर्षक आकाराच्या आंब्यांनी घेतली आहे. यात गावरान आंबा दुर्मिळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यात वाढते तापमान आणि बदलत्या हवामानाचा आंब्याच्या उत्पादनावर होणारा परिणाम तसेच बाजारातील गावरान आंब्याची दिवसेंदिवस कमी झालेली मागणी.

याशिवाय, आजोबाने लागवड करायची आणि नातू आंबे खाणार म्हणजेच जवळपास दहा वर्षांपेक्षा अधिक काळ या पारंपरिक गावरान आंब्यांना फळ धारणेकरिता लागायचा. अशा विविध कारणांमुळे गावरान आंबे बाजारातून बाहेर ढकलले गेले आहेत.

तर अलीकडे अधिक चमक असल्याने आणि आमरसास पूरक रसाळ आंबे असल्याने संकरीत आंब्यांची मागणी वाढती आहे.  

हे ही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

Web Title: Different types of mangoes are available in different markets of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.