Lokmat Agro >शेतशिवार > Digital Crop Survey : राज्यातील या ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वे; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी

Digital Crop Survey : राज्यातील या ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वे; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी

Digital Crop Survey will be conducted in these 34 talukas of the state In other taluks | Digital Crop Survey : राज्यातील या ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वे; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी

Digital Crop Survey : राज्यातील या ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वे; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी

Digital Crop Survey : ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचणार आहे.

Digital Crop Survey : ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Digital Crop Survey : राज्यातील पेरण्या झाल्या असून या पेरण्यांची नोंद सातबाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी ई पीक पाहणी करावी लागते. पण बऱ्याचदा शेतात न जाता शेतकरीपीक पाहणी करतात. किंवा शेतात एका पिकांची लागवड केली असताना दुसऱ्याच पिकांची नोंद करतात. त्यामुळे ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचणार आहे. 

दरम्यान, डिजीटल क्रॉप सर्वे ही प्रणाली म्हणजेच ई पीक पाहणी (DCS) आणि ई पीक पाहणी ही प्रणाली जवळपास सारखीच आहे. पण डिजीटल क्रॉप सर्वे करताना शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्राच्या गट हद्दीत जाणे बंधनकारक आहे. त्या गटाच्या हद्दीत गेल्याशिवाय शेतकऱ्याचा पोर्टलवर फोटो अपलोड करता येणार नाहीत. यामुळे सरकारपर्यंत अचूक माहिती जाण्यास मदत होऊन धोरणात्मक निर्णय घेण्यास फायदा होणार आहे. 

सध्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये डिजीटल क्रॉप सर्वेचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तर यामध्ये २ हजार ८५८ गावांचा सामावेश आहे. शेतकऱ्यांना तालुका निवडल्यानंतर एका प्रणालीद्वारे तुमचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक केले जाईल आणि त्यानंतर गट हद्दीत जाऊन शेतकऱ्यांना पिकाचा फोटो प्रणालीवर अपलोड करता येणार आहे. 

जिल्ह्यांतील या तालुक्यात होणार डिजीटल क्रॉप सर्वे

  • अमरावती -   वरुड 
  • बुलडाणा  -  बुलडाणा
  •  यवतमाळ  - दिग्रस 
  • वाशिम -  रिसोड 
  • छ. संभाजी नगर -  फुलंब्री 
  • धाराशीव - लोहारा 
  • जालना - बदनापुर 
  • नांदेड - मुदखेड 
  • परभणी - सोनपेठ 
  • बीड  - वडवणी 
  • लातूर - जळकोट 
  • हिंगोली - औंढा नागनाथ 
  • ठाणे - अंबरनाथ
  • पालघर - तलासरी 
  • सिंधुदुर्ग - वेंगुर्ला 
  • रायगड  तळा 
  • रत्नागिरी - लांजा 
  • नागपूर - काटोल 
  • गडचिरोली - देसाईगंज /वाडसा 
  • भंडारा - साकोली 
  •  चंद्रपूर - सिंदेवाही 
  • गोंदिया - आमगाव 
  • नाशिक - देवळा 
  • अहमदनगर -  श्रीरामपूर 
  • जळगाव - भुसावळ 
  • धुळे  - शिंदखेडा 
  • नंदुरबार  - तळोदा 
  • अकोला - पातूर 
  • पुणे - दौंड 
  • कोल्हापूर - गगनबावडा 
  • सांगली - पळूस 
  • सातारा - खंडाळा 
  • सोलापूर - द.सोलापूर
  • वर्धा - कारंजा (घा)

Web Title: Digital Crop Survey will be conducted in these 34 talukas of the state In other taluks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.