शेतकरी बांधव दररोज प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. दरम्यान अनेकदा स्नायू ताणले जातात, ज्याचा थेट परिणाम हाडांवर होतो.
अशावेळी हाडांच्या विविध समस्या जाणवतात, ज्यातून पुढे हाडांचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शेतकरी बांधव याकडे फारसे लक्ष देत नाहीत.
विशेषतः हाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. केवळ अपघातामुळे फ्रॅक्चर झाले तरच हाडांची योग्य काळजी घ्यावी लागते, ही समज दृढ झाल्याने सहसा शेतकरी परिवारातील कोणीही हाडांच्या समस्यांकडे अपेक्षित लक्ष देत नाही.
याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हाडांच्या तक्रारी टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी.
हाडांचे विकार कोणते असतात?
• मणके, गुडघे, खांदे दुखणे
• हाड विकृती (deformities)
• हाडांची झीज (osteoporosis)
• हाडे कमजोर होणे आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका.
हाडांची काळजी कशी घ्यावी?
• ताण कामी करा : मर्यादेपेक्षा अधिक वजनाची ओझे उचलू नये, प्रमानाबाहेर स्नायू ताणू देऊ नये, विश्रांती घेत शेती कामे करावीत.
• कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन : दूध, दही, चीज, पालेभाज्या यामध्ये कॅल्शियम असते. तसेच व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते त्यामुळे यांचे सेवन करावे.
• तंबाखू आणि मद्य टाळा : तंबाखू आणि मद्यपानामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहणे फायद्याचे आहे.
• शरीराचे वजन योग्य ठेवा : कमी वजन असलेल्या किंवा शरीरयष्टी लहान असलेल्या व्यक्तींना ऑस्टिओपोरोसिसचा धोका अधिक असतो. त्यामुळे संतुलित आहार आणि योग्य शरीर यष्टी राखावी.
• हार्मोनल बदलांवर लक्ष ठेवा : थायरॉइड हार्मोनचे अधिक प्रमाण किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी इस्ट्रोजेनची कमी पातळी हाडांचे नुकसान वाढवू शकते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर हाडांमध्ये दुखणे, फ्रॅक्चर किंवा इतर हाडांशी संबंधित लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हाडांच्या आजराच्या उपचार पद्धती
• DEXA स्कॅन द्वारे हाडांची घनता मोजली जाते.
• कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि हार्मोन पातळीचे रक्त चाचण्या केल्या जातात.
हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार