PM Kisan Nidhi :पीएम-किसान (PM-KISAN) योजनेअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा 17 वा हप्ता येत्या 18 जून 2024 रोजी जारी करण्यात येणार आहे. पीएम मोदी हे वाराणसीला भेट देणार आहेत. आणि याच दिवशी याच ठिकाणाहून ते पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरीत करतील. याचबरोबर 30 हजारपेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे प्रदान करतील.
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj chauhan) यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान (PM-KISAN) योजनेअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा 17 वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान (PM Narendra Modi) 18 जून 2024 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरीत करतील. उत्तर प्रदेश सरकारच्या सहयोगाने केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.
किसान सन्मान निधी ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सर्व प्रकारची जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना आहे. लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी यामध्ये पूर्ण पारदर्शकता राखून, भारत सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांचे वितरण केले आहे. आता जारी केल्या जाणाऱ्या रकमेसह, योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, अशी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
वाराणसी येथून 17 व्या हफ्त्याचे वितरण
अनेक दिवसापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ व्या हफ्ता कधी येणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. यापूर्वी पीएम यांनी यवतमाळ येथून १७ वा हफ्ता वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून हा हफ्ता १८ जून रोजी देण्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पीएम यांच्या हस्ते मंगळवारी १८ जून रोजी वाराणसी येथून 9.26 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा 17 वा हप्ता वितरित होणार आहे.