कृषी विज्ञान केंद्र गांधेलीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मणुर तालुका वैजापूर येथील मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर बुधवार (दि.१०) रोजी चाचणी प्रयोग घेण्यात आले. तसेच शेतकर्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
त्या अंतर्गत मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना मोसंबी स्पेशल जैविक अर्काचे वाटप करण्यात आले. वाटप केलेले अर्क मोसंबी स्पेशल हे सूक्ष्म अन्नद्रव्य असून भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बेगळुरू (ICAR -IIHR) यांनी विकसित केलेले आहे. तसेच अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारी फळगळ थांबविणे करिता उपयुक्त असे हे अर्क आहे. मराठवाड्यातील मोसंबी बागांमधील होणारी ४८ टक्के फळगळ ही अन्नद्रव्यांचा असंतुलित वापरामुळे होत असल्याचे सर्वेक्षण असल्याने बागवानी अनुसंधान संस्थान बेगळुरू (ICAR -IIHR) यांनी हे अर्क विकसित केले आहे.
या अनुषंगाने केव्हीकेचे विषय विशेषज्ञ शरद अवचट व स्वप्नील वाघ यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच एकाच वेळी एका पेक्षा जास्त बहार घेण्याच्या पद्धतीमुळे झाडांची झालेली झीज भरून येत नाही, परिणामी बागा अशक्त होऊन कीड व रोगांना बळी पडतात. त्यामुळे बागेच्या संतुलित खत व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे. सोबत पाच वर्षा पुढील झाडांना ८००:४००:४०० ग्रॅम नत्र, स्पुरद व पालाशची खत मात्रा अवश्य द्यावी असे नमूद संगितले.
यासोबत मनूर परिसरातील विविध मोसंबी उत्पादक शेतकर्यांना भेटून विविध बुरशीमुळे फळ गळ होऊ नये या करिता बागेत पाण्याचा योग्य निचरा करणे . वेळोवेळी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी व बोर्डो पेस्ट लावणे इत्यादी कामे करण्याचे आवाहन केव्हीकेच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा - मराठवाड्याचा 'हा' शेतकरी ऐन आषाढात कमवत आहे महिना लाख रुपये