Join us

गाय पाळलेली असेल तर शेतकऱ्यांना गॅस सिलेंडरची गरज काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 22:42 IST

बायोगॅसपासून शेतकरी घरी लागणाऱ्या गॅसचे पैसे वाचवू शकतात.

शेतकरी शेतीमध्यो जोडधंदा करत असतो. कुणी शेळीपालन, कुणी कुक्कुटपालन तर कुणी दुग्धव्यवसायाचा जोडधंदा करतो. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीचा नफा किंवा उत्पादन घेण्यास मदत होते. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे शेण, दूध, दुधापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीतून नफा कमावता येतो. त्याचबरोबर शेणापासून बनवलेल्या बायोगॅसपासून शेतकरी घरी लागणाऱ्या गॅसचे पैसे वाचवू शकतात.

जर शेतकऱ्यांनी गायी पाळल्या असतील तर शेण थेट उकिरड्यावर फेकून न देता किंवा शेतात न टाकता जर त्यापासून बायोगॅस बनवला तर शेतकऱ्यांचा गॅस सिलेंडरचा खर्च वाचू शकतो. दुग्धव्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्यास शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन उत्पादन खर्चा वाढ होऊ शकते. 

दरम्यान, चार गायींच्या शेणापासून चार जणांच्या कुटुंबासाठी लागणारा गॅस तयार होऊ शकतो.  कुटुंबाला लागणाऱ्या गॅसचे पैसे वाचल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते असं पशुव्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉ. योगी सांगतात. 

बायोगॅसच्या माध्यमातून बनवलेला गॅस हा व्यवसायिक दृष्टीकोनातून विक्री करण्यास मनाई असल्यामुळे आपण घरगुती वापर करू शकतो. 

माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगाय