प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षातून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन समान हप्ते दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pmkisan योजनेचा एक भाग म्हणून, शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी करणे, त्यांचे बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य आहे. जे लाभार्थी ३० सप्टेंबपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतील तसेच बँक खाते आधार तपशील प्रदान करणार नाहीत त्यांना पंतप्रधान किसान योजनेतून अपात्र ठरवले जाईल.
पीएम किसानचे अठरा हजार लाभार्थी
पीएम किसान योजनेचे मावळ तालुक्यात एकूण १८०८० सक्रिय लाभार्थी असून त्यापैकी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २६२३९ असून बँक खात्यासोबत आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २७३९८ इतकी आहे.
१६ हजार शेतकऱ्यांनी केली ई-केवायसी
पीएम किसान योजने अंतर्गत आतापर्यंत मावळमधील एकूण सक्रिय असलेल्या १८,०८० शेतकऱ्यांपैकी १६,२३९ शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली असून १,८४१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असून मावळ तालुक्यात जवळपास १० टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
१५ हजार शेतकऱ्यांचे आधार सीडिंग
पीएम किसान योजनेअंतर्गत तालुक्यातील आधार प्रमाणीकृत शेतकयांची संख्या १७ हजार ३५८ इतकी असून आधार प्रमाणीकृत खात्याची संख्या १५ हजार ५०५ इतकी आहे. खात्याशी न जोडलेल्या खात्याची संख्या १ हजार ५३६ आहे तर ३५७ खाती पडताळणीसाठी प्रलंबित आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करून घ्यावे, अन्यथा नाव वगळले जाऊ शकते. - दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ