Lokmat Agro >शेतशिवार > Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

do seed treatment now to prevent fungal diseases in paddy rice crop | Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

कृषी विभागाकडून मागील काही दिवसांपासून बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. याशिवाय बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी विभागाकडून मागील काही दिवसांपासून बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. याशिवाय बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

कोकणातभात प्रमुख पीक असून भात लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले जात आहे. भात बियाण्यास बीजप्रक्रिया तीन प्रकारे केली जाते. त्यानुसार मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया करताना, १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून भात बियाणे ओतावे व चांगले ढवळून घ्यावे.

द्रावण स्थिर झाल्यावर पोकळ, हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगद काढून तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत चोवीस तास वाळवावे व त्यानंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

यामध्ये पीएसबी (स्फुरद विरघळणारे जिवाणू) हे जिवाणू जमिनीतील स्फुरद विरघळणारे पिकास उपलब्ध करून देतात, याचे वापराचे प्रमाण २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे, ऑझटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात.

वापराचे प्रमाण २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे घ्यावे. वरीलप्रमाणे खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी भात बियाण्यास आवश्यक प्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

बुरशीचा नायनाट करण्यासाठी बीजप्रक्रिया
-
बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेमुळे बियाण्यात राहणाऱ्या व तसेच उगवल्यानंतर पिकास अपायकारक असणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी बीजप्रक्रिया करतात.
- यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बनडिझम, यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे लागते.
- तर जिवाणू खताची बीजप्रक्रिया करण्यासाठी बियाणे रुजल्यापासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध व्हावे म्हणून जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली जाते.

अधिक वाचा: Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन

Web Title: do seed treatment now to prevent fungal diseases in paddy rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.