आवळा हे औषधी गुणधर्मान व त्यातील जीवनसत्व क च्या मात्रेमुळे जगभर ज्ञात आहे. औषधी गुणधर्मावरोवरच त्याचे आहार मुल्य ही चांगले आहे. आवळा फळाच्या १०० मि खाण्यायोग्य गरात ७०० मि.ग्रॅ. पर्यंत क जीवनसत्व व इतर खनिज द्रव्य व तंतुमय पदार्थ ही भरपूर प्रमाणात असतात.
आवळा पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पंच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटु. तुरट), कच्चा आवळा मिठासोबत खाल्यास शरीरास सर्व रस मिळतात. च्यवनप्राश चा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळा सेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.
गंभीर आजाराविरुध्द लढण्यासाठी शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबुत असणं आवश्यक आहे. रोग प्रतीकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमीत व्ययामासह आहारामध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश असावा. शरीरास पोषक असणान्या तसेच मोसमा प्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. आवळयाची आंबट तुरट चव असल्यामुळे ताजी फळे तसीच खाणे अवघड आहे. याकरीता आवळयावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
आवळा प्रक्रिया करुन त्यापासुन आवळा मुरंब्बा, आवळा जॅम, आवळा गर, आवळा सरबत, आवळा लोणचे, आवळा चूर्ण, आवळा कॅन्डी, आवळा गोळया, आवळा चटणी आणि आवळा स्कॅश आदी चवदार पदार्थांची निर्मीती करता येते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणारे अनेक लघु व मध्यम उद्योगाची श्रृंखला ग्रामीण भागात उभी करुन महिलांना चांगला मोबदला मिळु शकतो. कोणतीही मोठी खर्चीक यंत्रणा न वापरता अत्यंत साध्या व घरगुती प्रक्रियेतून आवळ्यावर प्रक्रिया करुन ताज्या आवळाच्या विक्री पासुन मिळणाया उत्पन्नाच्या दुप्पट तिप्पट उत्पन्न मिळवता येते. आवळयापासुन घरच्या घरी अनेक गृहीनिंणा फावल्या वेळातही अशा प्रकारचे पदार्थ तयार करता येतील. अतिशय कमी खर्चात आणि सोप्या पध्दतीने हा उद्योग बेरोजगार स्त्रियांसाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टिने अतिशय उपयुक्त आहे. आवळयाच्या विविध पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे व आवळा प्रक्रिया उद्योग विकसीत होण्यास चांगला वाव आहे
आवळयातील औषधी गुणधर्म
आवळयामध्ये 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते (संत्रा फळापेक्षा १० टक्के अधिक), आवळा हा पाचक, ज्वर नाशक, स्नायु व वीर्य वर्धक व दात मजबुतीसाठी उपयुक्त आहे. आवळयातील औषधी गुणधर्म हृदयातील बिटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. त्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते.
ॲसीडीटी व बध्दकोष्ठतेपासुन आराम
आवळयाचा चुर्ण व आवळयाचा मुरंब्बा सेवन केल्याने अॅसीडीटी व बध्दकोष्ठतेपासुन आराम मिळतो.
केसांचे सौंदर्य
सुंदर व चमकदार केसांसाठी आवळा फायदेशीर आहे. त्यामुळे केस मजबुत होतात व काळे राहतात.
डोळे आणि त्वचेचे सौंदर्य
आवळयातील व्हिटॅमीन सी हा त्वचेसाठी आवश्यक घटक आहे. या पोषक तत्वामुळे डोळयांचे आरोग्य व त्वचेचे सौंदर्य खुलते. मोतीबिंदु प्रतिबंधास मदत होते.
मधुमेह
आवळयातील क्रोमीयम तत्व शरीरातील इंसुलीन पेशी मजबुत करतात. परिणामी साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते
हाडे मजबुती
आवळयातील कॅलशियममुळे हाडांच्या आजारापासुन आराम मिळतो.
वजन कमी करणे
शरीरातील चयापचायाची प्रक्रिया सुरळित होते. परिणामी वजन नियंत्रीत राहते.