Join us

भारतातील आंब्याच्या या प्रसिद्ध जाती तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या त्यांची वैशिष्टये...

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 02, 2024 1:13 PM

सुगंधासह गोड रसाळ चवीने आंबा बाजारपेठेत राज्य करतोय..पहा भारतातल्या या काही आंब्याच्या जाती

भारतात सुमारे १५०० हून अधिक आंब्याच्या जाती आहेत. प्रत्येक आंब्याची चव, आकार वेगळा. सुगंध आणि चवीचा अनोखा आंबा फळांचा राजा उगाच नाही. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान बाजारपेठांवरही आंब्याचे अधिराज्य असते. हापूस, केशर,तोतापूरी, लंगडा, बदाम, सिंधूरा, चौसा, पायरी अशा कितीकरी आंब्याच्या जाती. पाहूयात काय विशेष आहे त्यात?

हापूस

 आंब्याची ही सर्वात लोकप्रीय जात. महाराष्ट्रातील हा आंबा गुजरात, कर्नाटकातही काही भागात मिळतो. जगभरातून कोकणातील हापूसला मोठी मागणी असते. त्यामुळे या आंब्याची मोठी निर्यात केली जाते.

तोतापूरी

हिरवट रंगाचा आणि सौम्य चवीचा तोतापूरी आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये हा आंबा खाल्ला जातो. विशेष म्हणजे या आंब्याचा सॅलड आणि लोणच्यांमध्येही वापर केला जातो.

संधूरा

बाहेरून लाल पिवळी साल असणारा हा आंबा आंबट गोड चवीचा असतो. मँगो शेक करण्यासाठी या आंब्याचा वापर केला जातो.

रत्नागिरी

देवगड, रायगड, रत्नागिरी या भागातला सुप्रिसिद्ध आंबा असून हापूसच्या कुटुंबातलाच हा आंबा आहे. वजनानी तगडा आणि रसाळ गोड चवीचा हा आंबा सर्वात महाग आणि सर्वोकृष्ट जातींपैकी एक आहे.

चौसा

उत्तर भारतातला हा लोकप्रीय आंबा. बिहारमध्ये या बांब्याची जात शेरशाह सुरीने सोळाव्या शतकात लोकप्रीय केली. बिहारच्या एका शहरावरून या आंब्याला हे नाव दिले गेले आहे.

पायरी

तांबूस रंगाची छटा असणारा पायरी आंबा चवीला तसा आंबट. गुजरातमध्ये या आंब्याचा रस बनवण्यासाठी वापरला जातो. पायरी ही आंब्याची जात भारतभर लोकप्रीय आहे.

संबंधितMango History: जगाला आंबा या फळाची अशी भुरळ पडली, काय होता आंब्याचा इतिहास?

नीलम

भारतात बहुतांश भागात या जातीचा आंबा पिकवला जातो. साधारण जूनमध्ये हा आंबा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दिसू लागतो. केशरी सालीचा निलम आंबा इतर आंब्यांपेक्षा आकाराने लहान असतो.

लंगडा

वाराणसीचा हा प्रसिद्ध आंबा आहे. पाय नसलेल्या माणसाने पहिल्यांदा या आंब्याची लागवड केली म्हणून या आंब्याचे नावच लंगडा असे पडले. जुलै ऑगस्टमध्ये हा आंबा बाजारपेठेत येतो. अंडाकृती आकाराचा हा आंबा पिकूनही हिरव्या रंगाचा असतो.

केशर

केशरी रंगावरून या आंब्याचे नाव केशर असे पडले. अहमदाबाद, गुजरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात पिकवले जातात. मराठवाड्याचा केशर आंबा लोकप्रीय आहे.

बदाम

बदामी ही  कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात. एप्रिल ते जुलैमध्ये हा आंबा बाजारात येतो. पातळ सालीचा आणि भरपूर गर असणारा हा आंबा कर्नाटकातला हापूस म्हणून प्रसिद्ध आहे.

टॅग्स :आंबाबाजार