शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील प्राणिशास्त्र अधिविभागातील रेशीमशास्त्र पदविका (DS) आणि रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका (PGDS) या एका वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि. ०१ जुलै २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये अर्ज मागिवण्यात येत आहेत.
शैक्षणिक अहर्ता खालीलप्रमाणे
रेशीमशास्त्र पदविका (Diploma in Sericulture)
- शैक्षणिक अहर्ता: १० वी पास/शेतकरी ७ वी पास (रेशीम शेती करणारे व करू इच्छिणारे)
- माध्यम: मराठी
- प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे: ७ वी/१० वी/१२ वी पास पैकी एक गुणपत्रक, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो, सही, आईचे नाव, मोबाईल नंबर.
- अभ्यासक्रमांची फी: १०,०००/-
रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका (Post Graduate Diploma in Sericulture)
- शैक्षणिक अहर्ता: कोणत्याही शाखेतील पदवी (विज्ञान/कृषी)
- माध्यम: इंग्रजी
- प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे : पदवी/पदव्युत्तर पास पैकी एक अंतिम वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो, सही, आईचे नाव, मोबाईल नंबर.
- अभ्यासक्रमांची फी: १०,०००/-
अधिक माहितीसाठी प्राणिशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याशी ७८४१९५५९२३ व ०२३०- २६०९२४९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
तसेच प्रवेशासाठी seripgdiploma@unishivaji.ac.in या ई-मेल वरती आपली कागदपत्रे Pdf Scan करून पाठवावीत.