Lokmat Agro >शेतशिवार > महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

Does any farmer give to Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme? | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात अनुदान देत आहे. (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme)

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात अनुदान देत आहे. (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme)

शेअर :

Join us
Join usNext

हरी मोकाशे 

पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे.  आतापर्यंत १ लाख २८ हजार ७८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.  योजनेअंतर्गत पात्र १ हजार ६७२ शेतकऱ्यांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. 

गावोगावी गटसचिव जाऊन चौकशी करू लागले आहेत. ५० सन २०१७ ते २०२० या कालावधीत नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत देण्यात येत आहे. 

प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभासाठी जिल्ह्यातील एकूण १ लाख ८४ हजार ६९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३१ हजार ९२२ शेतकरी अनुदानास पात्र ठरले होते. आधार प्रमाणीकरणानंतर - लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणास ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

४१० कोटी रुपयांचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी १ लाख ३१ हजार ९२२ जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ९२२ शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले होते. आतापर्यंत १ लाख २८ हजार ७८ शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून ४१० कोटी ४७ लाख रुपयांचे वितरण झाले आहे.

नोंदणीकृत एकूण शेतकरी१,८४, ६९९ 
प्रोत्साहनपर अनुदानास पात्र१,३१,९२२
आधार प्रमाणीकरण लाभार्थी१,३०,३३६
शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ१,२८,०७८  


शेतकरी नसल्यास पुरावा जोडावा

• प्रोत्साहनपर लाभ योजनेत पात्र ठरलेल्या, परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तालुकास्तरावरील सहायक निबंधक कार्यालयाकडे याद्या पाठविल्या आहेत. 

• सहायक निबंधकांनी गावोगावीच्या गटसचिवांना लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती देऊन त्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शेतकरी बाहेरगावी राहत असल्यास अथवा मयत
असल्यास त्याचा पुरावा जोडावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रमाणीकरण प्रलंबित

प्रोत्साहन अनुदान योजनेस पात्र  शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अंगठा लावून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निबंधक कार्यालय तर्फे करण्यात आले आहे.

 २८ हजार शेतकरी अपात्र

प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी २८ हजार ४८९ शेतकरी शासनाच्या निकषात बसले नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवीत शासनाने योजनेच्या लाभातून वगळले होते. परिणामी, जिल्हयातील १ लाख २१ हजार ९२२ शेतकरी अनदानासाठी पात्र राहिले होते.


जिल्ह्यातील ८९७ तक्रारींचे निवारण

• महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त्ती योजनेअंतर्गतच्या प्रोत्साहनपर लाभ योजनेसंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

• तालुका आणि जिल्हा पातळीवर एकूण ८९७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. २० तकारी अजनही प्रलंबित आहेत.

७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ

प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधारप्रमाणीकरण करून घ्यावे. त्यासाठी बँकांना कळविण्यात आले आहे. त्याची गटसचिव आणि सहायक निबंधकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गटसचिव गावात जाऊन शेतकऱ्यांची माहिती घेत आहेत. - संगमेश्वर बदनाळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

तालुका  आधार
औसा  २३१
अहमदपूर   २३९
चाकूर    १६६
देवणी १३२
जळकोट ५१
लातूर     १४९
निलंगा   २२२
रेणापूर३२
शिरुर अनं.६३
उदगीर३८६

Web Title: Does any farmer give to Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.