Lokmat Agro >शेतशिवार > जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट; धाराशिवमध्ये ऊस जळाला

जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट; धाराशिवमध्ये ऊस जळाला

Double sowing crisis in Jalna district; Sugarcane dried in Dharashiv | जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट; धाराशिवमध्ये ऊस जळाला

जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट; धाराशिवमध्ये ऊस जळाला

भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने फिरवली त्यामुळे दुबार पेरणीच्या धास्तीने चिंतेचे ढग दाटले आहेत. तर पावसाअभावी लोहारा तालुक्यातील ऊस जळाला आहे.

भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने फिरवली त्यामुळे दुबार पेरणीच्या धास्तीने चिंतेचे ढग दाटले आहेत. तर पावसाअभावी लोहारा तालुक्यातील ऊस जळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारी दुपारी समाधानकारक पाऊस झाला. मात्र याच तालुक्यातील काही गावामधील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पिंपळगाव रेणकाई परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. काही दिवसापूर्वी परिसरात पावसाचे वातावरण तयार झाले.  पडेलच या आशेवर शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली. मात्र आता तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

 पावसाळा सुरू होऊन महिना शक्यता आहे. यामुळे चान्यासाठी संपत आला असला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग जमा व्हायला सुरूवात झाली आहे. पेरणीसारखा पाऊसच न झाल्याने यंदा चाराटंचाईचेही संकट उभे आहे.

पाऊस पडेल या आशेवर बुधवारी अडीच एकर सोयाबीन पेरणी केली. पेरणीसाठी १५ हजार रुपये खर्च आला आहे. परंतु आता पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची चिंता आहे. विहिरीत थोडेफार पाणी आहे. त्यामुळे तुषारद्वारे पाणी देत आहोत.
- विजय देशमुख, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन

शेतकऱ्यांनी घाई करु नये
शेतकऱ्यांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. तरीही काही शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर खरिपाची पेरणी केली आहे. आता पावसाची वाट पाहावी लागत आहे. शेतकन्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करु नये.
- रामेश्वर भूते, तालुका कृषी अधिकारी.

ऊस जळाला,पाणी प्रश्नही गंभीर 
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) शिवारातील उसाचे पीक पाण्याअभावी जळाले असून, जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी कै. गयाबाई रावसाहेब पाटील संस्थेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, लोहारा (खुर्द) येथील सर्व शेतकऱ्यांच्या बोअर व विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे उसाचे उभे पीक व इतर बागायती पिके जळून खाक झाली आहेत. तसेच गावासाठी दोन पाझर तलाव व एक सिंचन तलाव असून, त्यात थेंबभरही पाणी नाही. त्यामुळे जनावरांबरोबच वन्य प्राणी, पशू पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना पाणी आठ दिवसाआड मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Double sowing crisis in Jalna district; Sugarcane dried in Dharashiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.