Lokmat Agro >शेतशिवार > डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

Dr. Kunal Khemnar appointed as State Sugar Commissioner | डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सहकार आयुक्त म्हणून राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेचे अतिरिक्त विकास ढाकणे व उपायुक्त प्रसाद काटकर यांचीही बदली करण्यात आली आहे. डॉ. खेमनार यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती झाली आहे.

सध्याचे साखर आयुक्त अनिल कवडे यांची ५ फेब्रुवारी रोजी सहकार आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. कवडे ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे खेमनार १ एप्रिल रोजी साखर आयुक्त म्हणून कार्यभारस स्वीकारतील असे सांगण्यात आले.

तर सध्याचे सहकार आयुक्त असलेले सौरव राव यांच्या बदलीचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. राव यांनीही ५ फेब्रुवारीलाच सहकार आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता. २००३ च्या तुकडीचे सनदी अधिकारी सौरव राव हे गेल्या १० वर्षांपासून पुण्यातील विविध पदांवरू कार्यरत होते.

Web Title: Dr. Kunal Khemnar appointed as State Sugar Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.