Lokmat Agro >शेतशिवार > स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

Dr. Swaminathan, the father of Indian Green Revolution passed away | स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक व जेष्ठ शेतीतज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.

भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक व जेष्ठ शेतीतज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.

शेअर :

Join us
Join usNext

भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक व जेष्ठ शेतीतज्ञ डॉ एम. एस. स्वामीनाथन यांचे आज (गुरुवारी) निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी चेन्नईतील तेनमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी ११.१५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

भारतातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यात मोलाची भूमिका असणारे तसेच धान्याच्या, विशेषतः तांदळाच्या विविध उच्च प्रजाती तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. एम. एस स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन असा परिवार आहे. 

डॉ स्वामीनाथन यांच्याविषयी
मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळमाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३ मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषि क्षेत्रातली पदवी घेतली.

स्वामीनाथन यांचा विवाह मीना स्वामीनाथन यांच्याशी झाला होता. हे दोघे केंब्रिजमध्ये शिकत असताना १९५१ मध्ये त्यांची भेट झाली होती. ते चेन्नई, तामिळनाडू येथे राहत होते. सौम्या स्वामीनाथन (एक बालरोगतज्ञ), मधुरा स्वामीनाथन (अर्थशास्त्रज्ञ) आणि नित्या स्वामीनाथन या त्यांच्या तीन मुली आहेत.

गांधी आणि रमण महर्षी यांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या २,००० एकरपैकी एक तृतीयांश त्यांनी विनोबा भावे यांच्या कारणासाठी दान केले. २०११ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की जेव्हा तो तरुण होता तेव्हा त्याने स्वामी विवेकानंदांचे अनुसरण केले. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे

पुरस्कार
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राईज १९८७ इ.

    कारकीर्द
    कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.

    नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषि संशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.

    स्वामिनाथन आयोग काय आहे?
    वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर २००४ साली समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी एम एस स्वामीनाथन यांनीच केल्या होत्या. २००६ साली या आयोगाने सविस्तर अहवाल सादर केला, ज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी मिळणारा हमीभाव हा त्यांच्या उत्पादनाच्या खर्चापेक्षा किमान दुप्पट असावा अशी शिफारस करण्यात आली होती.

    आयोगाची उद्दिष्टे
    - अन्नसुरक्षा आणि पोषण यांसाठी नियोजन.
    उत्पादन, नफ्याचे प्रमाण आणि शाश्वत शेती या निकषांवर शेतीची व्यवस्था.
    ग्रामीण भागातला थेट शेतीला होणारा पतपुरवठा वाढवणे.
    - कोरडवाहू आणि डोंगराळ भागातल्या शेतीसाठी योजना.
    - आंतरराष्ट्रीय बाजारात किमतींच्या चढउतारांमुळे होणाऱ्या या आयातीचा कमीत कमी परिणाम देशातील शेतीवर होईल अशी यंत्रणा.
    - शेतमालाची गुणवत्ता आणि किंमत यांची जागतिक बाजाराशी सांगड घालून सक्षम बनवणे.
    - स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देऊन त्यांच्याकडून शेतीपूरक पर्यावरण आणि जीवसंस्थांचं जतन आणि संवर्धन करणे.

    आयोगाच्या शिफारशी
    -
    शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नफ्यातील ५० टक्के वाटा मिळायला हवा.
    - शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावे.
    - शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५०% असावा.

    Web Title: Dr. Swaminathan, the father of Indian Green Revolution passed away

    Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.