चक्रधर गभणे
चाचेर (ता. मौदा) येथील रोशन रमेश बरबटे या तरुण शेतकऱ्याने त्याच्या एक एकर शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड (Dragon Fruit Cultivation) केली आहे. तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांनी नुकतीच या बागेची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.
या फळाचा गोडवा आणि आरोग्यदायी फायद्यामुळे अनेकजण त्याची खरेदी करतात. आतापर्यंत परराज्यातून ही फळे विविध बाजारपेठेत येत होती. पण राज्यातही या फळाची शेती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी भागासाठी, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हे फळ वरदान ठरले आहे. (Dragon Fruit Cultivation)
एकदा लागवड केल्यानंतर किमान २० वर्षे हमखास उत्पादन घेता येते. ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय निंबाळकर यांनी व्यक्त केली. (Dragon Fruit Cultivation)
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
* ड्रॅगन फ्रूटची लागवड (Dragon Fruit Cultivation) आणि बागेचे व्यवस्थापन आपण कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार करतो.
* रोग व किडींचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करतो, अशी माहिती रोशन बरबटे याने दिली असून, दिवसेंदिवस या फळाचे दर खाली येत असल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
कृषी व महसूल विभागाच्यावतीने चाचेर येथे शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात ड्रॅगन फ्रूटच्या लागवड (Dragon Fruit Cultivation) व्यवस्थापनाची शेतकऱ्यांना देण्यात आली.
तहसीलदार व इतर माहिती दत्तात्रय निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील, मंडळ कृषी अधिकारी स्वाती बोरजे, संदीप नाकाडे, आत्माचे दिनेश फुंडे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांनी रोशन बरबटे याच्या ड्रॅगन फ्रूट बागेची पाहणी केली. या फळाबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
एका एकरात सहा लाखांचे उत्पादन
ड्रॅगन फ्रूट हे १८ महिने १० दिवसांचे पीक आहे. या कालावधीत एका एकरात आपल्याला सहा लाख रुपयांचे उत्पादन झाले, अशी माहिती रोशन बरबटे याने दिली.
आपण चार वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची शेती करीत असून, ही फळे फलधारणेपासून १८ महिन्यांनी तोडणीयोग्य होतात. त्यानंतर दर २० दिवसांनी किमान दोन क्विंटल फळे तोडायला येतात, असेही रोशनने स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना माहिती दिली तर रोशन बरबटे याने अनुभव कथन केले. प्रतिकिलो १५० रुपये दर आपण काही फळे छोट्या बाजारपेठेत तर काही नागपूर व भंडारा बाजारपेठेत विकतो.
या फळांना सरासरी १५० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. फळे तोडायला किमान ३० हजार रुपये खर्च येतो. वर्षाकाठी सहा लाख रुपयांचे उत्पादन होत असून, किमान १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे एका एकरात खर्च वजा जाता ४ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे रोशन बरबटे याने सांगितले.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत नवीन पिकांचा प्रयोग करायला हवा. खर्च कमी करून अधिक नफा मिळविण्यावर लक्ष्य केंद्रित करायला हवे. - दत्तात्रय निंबाळकर, तहसीलदार, मौदा
मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे. - माणिक पाटील, तालुका कृषी अधिकारी, मौदा