Lokmat Agro >शेतशिवार > Dragon Fruit Cultivation : माळरानावर 'ड्रॅगन फ्रुट'ची लागवडीचा प्रयोग वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation : माळरानावर 'ड्रॅगन फ्रुट'ची लागवडीचा प्रयोग वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation: Read the details of the experiment of cultivating 'dragon fruit' on Malrana | Dragon Fruit Cultivation : माळरानावर 'ड्रॅगन फ्रुट'ची लागवडीचा प्रयोग वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation : माळरानावर 'ड्रॅगन फ्रुट'ची लागवडीचा प्रयोग वाचा सविस्तर

Dragon Fruit Cultivation : नोकरी करत विलास नायकोडे यांची वडिलांना शेतीकामात मदत करत आंबेवडगावात ड्रॅगन फ्रुटची लागवड करत नवप्रयोगाकडे वाटचाल सुरू केली आहे.

Dragon Fruit Cultivation : नोकरी करत विलास नायकोडे यांची वडिलांना शेतीकामात मदत करत आंबेवडगावात ड्रॅगन फ्रुटची लागवड करत नवप्रयोगाकडे वाटचाल सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Dragon Fruit Cultivation :

धारूर : तालुक्यातील आंबेवडगाव येथील शेतकरी भुजंग काशिनाथ नायकोडे यांनी मुलाच्या मदतीने स्वतः च्या शेतामध्ये दीड एकरात या वर्षी ड्रॅगन फ्रुटची लागवड (Dragon Fruit Cultivation) केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नवीन फळबागांची लागवड केली आहे.

ऊस आणि कापसापासून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. तसेच डोंगर परिसरामध्ये रानडुकरांचे प्रमाण वाढल्यामुळे ऊस आणि इतर पिकांची खूप नासाडी होत होती. याला वैतागून भुजंगराव नायकोडे आणि त्यांचा मुलगा विलास नायकोडे यांनी आपल्या शेतामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले.

या माळरानावर कुसळी गवताशिवाय कोणतेही पीक चांगले येत नव्हते. त्यामुळे इतर पिकांना कंटाळून वनरक्षक विलास नायकोडे यांना ड्रॅगन फ्रुटचे पीक घेण्याची संकल्पना सुचली. मित्र श्रीमंत थोरात, राहुल नायकोडे, देवीदास घोळवे, राज नायकोडे यांनी त्यांना ड्रॅगन फ्रुट लावण्याचा सल्ला दिला.

धारूर कृषी कार्यालयाचे मंडळ अधिकारी स्वामी व श्रीनिवास अंडील यांनी मोलाचे सहकार्य करीत ड्रॅगन फुट लावण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी केज तालुक्यातील होळ या गावातून सिद्धेश्वर खाडे यांच्याकडून रोपांची खरेदी केली.

दीड एकर क्षेत्रावर त्यांनी ३ हजार ५०० रोपांची लागवड केली. विलास भुजंगराव नायकोडे हे धारूर कार्यालयात वनरक्षक या पदावर नोकरी करीत आहेत. नोकरी करत आपल्या गावातील दीड एकर क्षेत्रावर नवीन ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. यासाठी त्यांना चार लाख रुपये खर्च आला. हा खर्च एकदाच येतो. इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घ्यावे, असे कृषी विभागाचे कृषी साहाय्यक श्रीनिवास सांगितले.

कमीतकमी खर्चात शेती

* या झाडांना पाणी कमी प्रमाणात लागते तसेच फवारणी करण्याची गरज नाही.

* नैसर्गिकरीत्या या फळझाडांना काटे असल्यामुळे रानडुक्कर व इतर प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण होते.

शेतकऱ्यांनी कमीतकमी खर्चाची शेती करून ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन जास्तीतजास्त प्रमाणात घ्यावे, असे आवाहन विलास नायकोडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Strawberry Farming: काय सांगताय! पाच गुंठ्यात सव्वा लाखांचे उत्पन्न देणारी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

Web Title: Dragon Fruit Cultivation: Read the details of the experiment of cultivating 'dragon fruit' on Malrana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.