Lokmat Agro >शेतशिवार > आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

Draksha Pandhari Decline in export of grapes from Sangli district in the international market | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

संजयकुमार चव्हाण
मांजर्डे : सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.

तासगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात, यावर्षी मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे.

त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा चांगल्या पद्धतीने तयार केल्या आहेत. जिल्ह्यातून यंदा आजपर्यंत १,१४४ कंटेनरमधून १५ हजार ६४६ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे.

निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा द्राक्षाची निर्यात घटल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून युरोपियन व इतर देशात निर्यातीस सुरुवात होते. जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात झाली.

आजपर्यंत निर्यात झालेले कंटेनर

देशकंटेनरवजन
ऑस्ट्रिया६९.१
कॅनडा१९३२४.१३
चीन६९१७१.३९
क्रोआशिया१३
डेन्मार्क२१२६२.०८
जर्मनी१०८.३
हाँगकाँग७६.५
आयर्लंड९७.४४
इटली६८.५२
कुवैत१८
मलेशिया२१२७२.९
नेदरलँड४१५५४७७.४७
नार्वे३६४३२
ओमान१३१.०६
कतार१३.२५
रोमानिया१११५०
रशियन फेड१९३६८.८६
सौदी अरेबिया८७१३४७.६८
सिंगापूर७०.९९
स्पेन१०२.९६
तैवान१२.४८
थायलंड११५.२३
यु.ए.ई२४९३५०५,७१
युना. किंगडम१०५१४३६.७३

गतवर्षी १३१४ कंटेनरची परदेशात द्राक्षे निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ६२७ द्राक्ष उत्पादकांची नोंदणी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीकर कमी असल्याने शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल कमी राहिला. - मनवेश चेछानी, काल्या एक्सपोर्ट्स नाशिक जनरल मॅनेजर

Web Title: Draksha Pandhari Decline in export of grapes from Sangli district in the international market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.