महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त अधिकृत रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (RPTO) कार्यरत आहे. दर महिन्याला संस्थेद्वारे ड्रोन पायलट प्रमाणपत्र प्रशिक्षण दिले जाते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले कृषि विद्यापीठ आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थीना रिमोट पायलट (ड्रोन) प्रमाणपत्र दिलेले आहे.
प्रशिक्षण अभ्यासक्रम• तासिका वर्ग : २ दिवस• सिम्युलेटर : १ दिवस• ड्रोन प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण : २ दिवस• अतिरिक्त विशेष कृषि ड्रोन (फवारणी) प्रशिक्षण : २ दिवस
पात्रता• १० वी पास किवा त्या समान.• वय : १८-६५ वर्षांपर्यंत.• वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.
सुविधा• प्रशस्त ड्रोन प्रयोगशाळा प्रशिक्षित ड्रोन प्रशिक्षक.• विशेष कृषि ड्रोन प्रयोगशाळा.• आधुनिक प्रशिक्षण वर्ग व गंथालय.• प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था.
संपर्क• कास्ट प्रकल्पाला भेट द्यावी.• ई-मेल : mpkvrptomaharashtra@gmail.com• भ्रमणध्वनी : ९४२०३८२०४९ / ९४२२३८२०४९ / ८८५५०९४०२९