Lokmat Agro >शेतशिवार > दुष्काळाने पोटात आणला गोळा; कसा साजरा करायचा बैलपोळा?

दुष्काळाने पोटात आणला गोळा; कसा साजरा करायचा बैलपोळा?

Drought made a lump in the stomach; How to celebrate bailpola? | दुष्काळाने पोटात आणला गोळा; कसा साजरा करायचा बैलपोळा?

दुष्काळाने पोटात आणला गोळा; कसा साजरा करायचा बैलपोळा?

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून चार आणि पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न निर्माण होण्याची ...

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून चार आणि पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न निर्माण होण्याची ...

शेअर :

Join us
Join usNext

पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून चार आणि पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या असल्याने दुष्काळाच्या छायेत बैल पोळा कसा साजरा करावा अशी एकूणच परिस्थिती निर्माण झाली आहे.

जूनच्या सुरुवातीचे काही दिवस खरीप हंगामातील पर्जन्यमानाने जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. जिल्ह्यात केवळ ५६ टक्के इतकाच पाऊस झाल्याने ९२ पैकी ५४ मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत ६७२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मागीलवर्षी आतापर्यंत ८७१ मिमी इतका पाऊस झाला होता तर आतापर्यंत ३८० मिमी पाऊस झालेला आहे. सिन्नर तालुक्यातील ४१ गावांमध्ये तर पेरणी होऊ शकली नसल्याने जिल्ह्यातील पावसाची भीषणता लक्षात येते. ऑगस्टपर्यंत ६७२ मिमी पाऊस अपेक्षित असतांना यंदा मात्र ३८० मिलिमीटर म्हणजे ५६ सावटामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

जिल्ह्यात केवळ 56 टक्के पाऊस

जिल्ह्यात ऑगस्टच्या अखेरपर्यंत सरासरी ६७२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा मात्र केवळ ३८० मिलिमीटर म्हणजे ५६ टक्के पाऊस झाला आहे. अनेक तालुके तर अजूनही ५० टक्केच्या खालीच आहेत.

पिकांची चिंता, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

खरीप पिकांची चिंता असताना पिण्याच्या पाण्याला; मात्र प्राधान्य द्यावे लागणार आहे. नाशिक महापालिकेची ४ हजार ५०० दलघफू पाण्याची आवश्यकता असून तितकी उपलब्धता आहे. मात्र पालखेड व गिरणा समूहात पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य संकटात आहे.

आता पेरले उगवणार की नाही याचे काहीही सांगता येत नाही. पाऊस आता होऊनही त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याचे यंदा नुकसान ठरलेलेच आहे. • रामेश्वर कदम, शेतकरी

 

यावर्षी पाऊस नसल्याने विहिरींना पाणी कमी पडल्याने रब्बी हंगामदेखील धोक्यात आला आहे- शंकर उगले, शेतकरी

जनावरांना चारा कसा मिळणार?

खरीप हंगामातील झालेल्या पेयानुसार १६४३५९२.२१ मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध होणार आहे. हा चार ऑक्टोबर पासून उपलब्ध होईल. रब्बी हंगामातील पेरणीपासून होणारा अधिकचा चार उपलब्ध होऊ शकेल मात्र आता होणाया पावसावर चारा अवलंबून आहे.

कोणत्या धरणात किती पाणी साठा?

गंगापूर 96, कश्यपी 63, गौतमी गोदावरी 58, आळंदी 88, पालखेड 55, करंजवण 67, वाघाड 83, ओझरखेड 45, पुणे गाव 89, तिसगाव 0, दारणा 95, वालदेवी 100 कडवा 89, नांदूर मधमेश्वर 100, भोजापुर 72, चणकापूर 96, हरणबारी 100, केळझर 100, नागासाक्या 0, गिरणा 68, पुना 74, माणिकपुंज 0

Web Title: Drought made a lump in the stomach; How to celebrate bailpola?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.