Lokmat Agro >शेतशिवार > कमी पावसाने उत्पादन घटले, कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड

कमी पावसाने उत्पादन घटले, कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड

Due to lack of rain, the production has decreased, farmers are struggling due to lack of satisfactory price for cotton | कमी पावसाने उत्पादन घटले, कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड

कमी पावसाने उत्पादन घटले, कपाशीला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड

शेतकरी चांगल्या दराच्या प्रतिक्षेत..

शेतकरी चांगल्या दराच्या प्रतिक्षेत..

शेअर :

Join us
Join usNext

रविंद्र शिवूरकर

मराठवाडा विदर्भ या कोरडवाहू किंबहुना पावसावर अवलंबून असलेल्या पट्टातील मुख्य नगदी पीक म्हणजे कपाशी होय. पिके ऊन धरत असून परिपक्क न झालेल्या कपाशीच्या कैऱ्यातुन देखील कापूस डोकावत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही ठिकाणी बाजारात देखील कापूस विक्री करिता आला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पन्न घट असतांना सुद्धा समाधानकारक बाजारभाव कापसाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांत निराशा निर्माण झालेली दिसून येत आहे. 

उष्णतेमुळे आणि कमी पाण्याच्या कमतरतेमुळे आधीचं उत्पन्नात जवळपास अर्ध्याहुन अधिक घट झाली आहे. त्यात काही अंशी शेतकऱ्यांकडे अद्याप गेल्या वर्षीचा कापूस साठवलेला आहे. ज्यांना या वर्षी अपेक्षित दर मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या वर्षीची सरासरी सहा हजार ते सात हजार अंदाज बघता ती अपेक्षा देखील भंग झाली आहे. 
 

वैजापूर तालुक्यात जवळपास एक टक्के शेतकऱ्याकडे कापूस साठवणीत आहे. मात्र या वर्षी अधिकाधिक ७५०० कापूस दर होईल त्यापेक्षा होणार नसल्याने हे शेतकरी दिवाळी नंतर कापूस बाजारात आणू शकतात. तेव्हा आवक वाढली तरी फारसा काही फरक भावावर दिसून येणार नाही सर्वसाधारण या वर्षी ६८०० ते ७५०० असा कपूर दर टिकून राहील. - नितीन चुडीवाल ( खासगी कापूस खरेदीदार वैजापूर )

राज्यात आतापर्यंत खासगी बाजारात दीड लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु दर प्रतिक्विंटल ६,८०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकरी दरवाढीचे प्रतीक्षेत आहेत..


कपाशीला सध्या पाण्याची गरज आहे मात्र विहिरीत पाणी नसल्याने देता येत नाही. त्यात ऊन जास्त असल्याने पिके सुकून चालली आहे. एक दोन वेचण्या कापसाच्या होतील त्यात पण झाडांची वाढ नसल्याने उत्पन्न घट आहे. 
- बाळकृष्ण धारबळे (शेतकरी कनक सागज ता. वैजापूर)

पिण्याचे पाण्यासाठी वणवण करण्याची परिस्थिती उद्भवळी आहे त्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाहीचं गेल्या वर्षी एकरी नऊ ते दहा क्विंटल कापूस घेतला या वर्षी एकरी चार ते पाच क्विंटल देखील मिळेल असं वाटत नाही. 
- राजेंद्र सुरडकर (शेतकरी पालोद ता सिल्लोड)

Web Title: Due to lack of rain, the production has decreased, farmers are struggling due to lack of satisfactory price for cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.