Lokmat Agro >शेतशिवार > कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर संकटाची मालिका

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर संकटाची मालिका

Due to onion export ban, series of crisis in farmers life | कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर संकटाची मालिका

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर संकटाची मालिका

कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मातीच होणार आहे.

कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मातीच होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मातीच होणार आहे, अशा शब्दांमध्ये शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

कांद्याचे उत्पादन हे पाऊस, हवामान आणि रोगराई यावर अवलंबून आहे. कांद्याचे उत्पादन कधी कमी, तर कधी जास्त होते. एका बाजूला कांद्याचे उत्पादन घटले आणि दरही पडले तर शेतकरी अडचणीत येतात. यंदाची अवस्थाही तीच आहे. पावसाने उत्पादन घटला आहे आणि निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आम्ही जगावं की मरावं? केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने आमची होतेय माती, असे कांदा उत्पादक शेतकरी म्हणत आहेत.

भाव नसल्याने जागेवरच कांदा लागला सडू निर्यातबंदीमुळे कांद्याला बाजारात भाव नाही. त्यामुळे एवढ्या कमी भावात कांदा काढणे आणि बाजारात नेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने कांदा शेतातच सडू लागला आहे. याबाबत सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

असा होतो कांद्यासाठीचा एकरी खर्च...
रोप तयार करणे आठ ते दहा हजार रुपये, मशागत व लागवड करणे दहा ते - बारा हजार एक वेळची खुरपणी सात ते आठ हजार, फवारणी १० ते १३ हजार रुपये, खताचे डोस १० ते १२ हजार, कांदा काढणी १३ ते १५ रुपये, कांदा एकूण उत्पादन खर्च एकरी ५५ ते ६४ हजार, काढणीनंतर खर्च बारदाना ३० रुपये दराने ४५००, वाहतूक ४० रुपये दराने दहा हजार, हमाली ७ रुपये रुपये दराने? ३०० एकूण खर्च ११ हजार रुपये, एकूण एकरी खर्च ७० ते ८० हजार रुपये खरचं लागतो.

कांदा सडू लागला
भाव नसल्याने जागेवरच कांदा लागला सडू निर्यातबंदीमुळे कांद्याला बाजारात भाव नाही. त्यामुळे एवढ्या कमी भावात कांदा काढणे आणि बाजारात नेणे परवडत नसल्याने कांदा शेतातच सडू लागला आहे.

अगोदरच पावसाअभावी दुष्काळ पडला आहे. खरीप रब्बी पावसाअभावी वाया गेले आहेत. आसमानी आणि सुलतानी संकटे एकाच वेळी आली तर आम्ही जगावं की मरावं?, असा प्रश्न सध्या कांदा उत्पादकांना पडला आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे. - पांडुरंग घोलप, कांदा उत्पादक शेतकरी

Web Title: Due to onion export ban, series of crisis in farmers life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.