Join us

भिजलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी लगबग, मजूरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 9:46 AM

ढगाळ वातावरणामुळे कापूस वेचणीला वेग

दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर शेती कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. नुकसानीतून वाचलेला, भिजलेला, काळवंडलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असताना पुन्हा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मजूरही मिळत नसल्याने कापूस वेचणीची तारांबळ उडत असल्याची स्थिती शेळगाव शिवारात पाहायला मिळत आहे.

परभणीतील शेळगाव तालुक्यात माेठ्या प्रमाणात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. तसे बहुतांशी राज्यातही कापसाचे पीक घेण्याचे प्रस्त मोठे. यंदा अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. जेमतेम पावसावर पिकेही बहरली. मात्र, कापूस वेचणीच्या वेळीच परतीच्या पावसाने कापसासह इतर खरीप, रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. यात कापसाच्या वाती झाल्या.

अवकाळी पावसाने शिवारातला कापूस भिजलाय? शेतकऱ्यांनी काय करावे?

मजूर मिळेनात...

सद्या पावसाने उघडीप दिल्याने कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यात रोज ढगाळ वातावरणामुळे पांढरे सोने घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कापूस वेचणीचे दहा रुपये किलोप्रमाणे पैस मोजावे लागत आहेत. 

टॅग्स :कापूसपाऊस