गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असून अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यात ठीक ठिकाणी हजेरी लावली आहे. उन्हाचा पारा उतरला असला तरी पाणीटंचाईच्या चटके वाढतच आहेत. सध्या लातूर जिल्ह्यातील 349 गावांच्या घशाला कोरड पडली आहे. ती कमी करण्यासाठी अधिग्रहणाचे 476 प्रस्ताव दाखल झाले आहेत.
प्रत्यक्ष पाहणीनंतर मंजुरी देण्यात येत असली तरी त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत नागरिकांना होरपळ सहन करावी लागत आहे.
गतवर्षाच्या पावसाळ्यात कमी पर्जन्यमान झाल्याने लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा उरला नाही. परिणामी भूजल पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तसेच बाष्पीभवनाचा वेग ही वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत तर विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिका ही उचक्या देऊ लागल्या आहेत. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील 298 गावे आणि 51 वाड्यांवर पाण्याचे समस्या जाणवू लागली आहे.
शिरूर अनंतपाळात एकही अधिग्रहण नाही
जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सात गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने तेथून 12 प्रस्ताव दाखल झाले आहेत.
मात्र अद्याप एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही त्यामुळे केवळ शिरूर अनंतपाळ तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अधिग्रहणाच्या पानावर 167 गावे
- लातूर जिल्ह्यातील 298 गावे आणि 51 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून अधिग्रहणाचे 476 प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 20 गावांचे 42 प्रस्ताव प्रत्यक्ष पाणी नंतर वगळण्यात आले आहेत.
- उर्वरित 289 गावांचे 312 प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत त्यापैकी 137 गावे आणि तीस वाड्यांचे अशा एकूण 167 गावांचे 183 प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिक रहनाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
24 गावांची टँकरची मागणी
- जिल्ह्यातील 24 गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या मागणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात 21 गावे आणि तीन वाड्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर तीन गावांचे प्रस्ताव करण्यात आला आहे.
- सध्या आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात लांब जना खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी, राजेवाडी, कारला, टेंभुर्णी या गावांचा समावेश आहे. आणखी एक टँकर मंजूर असून तेथील पाणीपुरवठा अद्याप सुरू नसल्याचा जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलंय.