Join us

१९ कारखान्यांची यंदाच्या गळीत हंगामात होणार दमछाक..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:38 AM

गळीत हंगामासाठी कारखाने सज्ज मात्र या कारखाऱ्यांची होणार अडचण...

सांगली जिल्ह्यात नव्या आणि जुन्या नाईक-चिखली, दालमियाँ शुगर करुंगली (ता. शिराळा), गणपती जिल्हा संघ- साखर कारखान्यांची संख्या २० झाली तुरची, विराज केन आळसंद, श्री श्री रविशंकर राजेवाडी, माणगंगा-आटपाडी, असून चक्क १९ कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज आहेत. 

या कारखान्यांने बॉलयरचे कारखान्यांसाठी एक लाख ३५ हजार ६८८ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे; पण या उसावर कर्नाटक राज्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचाही डोळा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाना व्यवस्थापनाला गळीत हंगाम पूर्ण क्षमतेन चालविताना दमछाक होणार आहे. ऊसतोडीसाठी मजूर मिळविण्यासाठी व्यवस्थापनाची धावपळ सुरू आहे.

श्रीपतराव कदम डफळापूर आदी दीपप्रज्वलन करून गळीत हंगामासाठी सज्ज आहेत. यामध्ये विराज केन गूळ पावडर तयार करीत असून त्यांनी तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. भारत शुगर, रायगाव शुगर, गणपती जिल्हा संघाचा तुरची श्रीपतराव कदम, माणगंगा हे कारखाने अनेक संकटांवर मात करून यावर्षी गळीत हंगाम सुरू करणार आहेत. या कारखान्यांसमोर ऊस टंचाईचेच संकट आहे. २०२२-२३ च्या गळीत हंगामात एक लाख ३७ हजार ५८४.९ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. त्यात यावर्षी एक हजार ८९६.९ हेक्टरने उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. २०२३-२४ च्या हंगामासाठी एक लाख ३५ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र आहे. 

गतवर्षीच्या हंगामात १४ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. या कारखान्यांनी ८२ लाख २२ हजार ३१९ टन उसाचे गाळप करून ९२ लाख ५६५ हजार ७८२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. या गळीत हंगामामध्ये नव्या व जुन्या २० पैकी १९ कारखान्यांकडून गाळप होणार आहे यामध्ये बंद महांकाली कारखाना सोडल्यास उर्वरित चार कारखान्यांनी हंगामाची तयारी केली आहे...

साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविणार आहे. १ नोव्हेंबरपासून आमचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. त्यापूर्वी २५ ऑक्टोबरपासून ऊसतोडणी मजूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. पाणीटंचाईमुळे उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे.- शरद लाड, अध्यक्ष, क्रांती कारखाना, कुंडल.

रायगाव शुगरचा चाचणी हंगाम सुरु

उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांनी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी रायगाव शुगर्सला परवानगी दिली आहे. प्रतिदिन नऊ हजार टन ऊस गाळपाची क्षमता असून सध्या चाचणी गळीत हंगामासाठी प्रतिदिन दोन हजार टनाने गाळप सुरु आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले आहे.

  

टॅग्स :साखर कारखानेसांगलीऊसशेतकरी