प्रशांत शिंदे
अहिल्यानगर : जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सात-बारा तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी ferfar फेरफार रूजू केला जातो.
शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शीपणे करण्यासाठी e ferfar ई-फेरफार प्रणाली सुरू केली. ई-हक्क प्रणालीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद, मृताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने 'ई-हक्क' प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तता करता येते. e hakka online 'ई-हक्क' प्रणालीत नाशिक विभागाने देखील राज्यात प्रथम क्रमांक पटाकवला आहे.
विभागात ३१ डिसेंबरपर्यंत २ लाख २६ हजार ९३८ शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहे. त्यातील १ लाख ८९ हजार ७५५ अर्ज स्वीकारण्यात आले असून ३५ हजार ५४३ अर्जात त्रुटी आढळून आल्याने परत पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये ६६१ अर्ज तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत.
फेरफारसाठी करा ऑनलाईन अर्ज
वारसाची नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा चढविणे, कर्जाचा बोजा कमी करणे, ई-करार नोंदणी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंबकर्त्याची नोंद कमी करणे, सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे.
महाराष्ट्र राज्य शासन प्रशासकीय सुलभता व गतीमानता या करिता विविध ई सुविधांचा वापर करीत आहे. ई हक्क या प्रणाली द्वारे अनोंदणीकृत फेरफार बाबत नागरिकांना ९ प्रकारचे फेरफार दस्त प्रत्यक्ष तलाठी कार्यालय येथे सादर करण्याची आवश्यकता नाही. नागरिक स्वतः लॉगिनद्वारे अथवा नजीकच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत उपरोक्त प्रमाणे फेरफार नोंदी करीता अर्ज दाखल करू शकतात. नागरिकांनी सदरील सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा. - सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी
अधिक वाचा: Sathekhat : साठेखत म्हणजे नक्की आहे तरी काय; का केले जाते साठेखत? पाहूया सविस्तर