Lokmat Agro >शेतशिवार > E-KYC : सोयाबीन-कापूस अनुदानासाठी घरच्या घरी २ मिनिटांत 'अशी' करा ई-केवायसी!

E-KYC : सोयाबीन-कापूस अनुदानासाठी घरच्या घरी २ मिनिटांत 'अशी' करा ई-केवायसी!

E-KYC for Soybean Cotton subsidy at home in 2 minutes | E-KYC : सोयाबीन-कापूस अनुदानासाठी घरच्या घरी २ मिनिटांत 'अशी' करा ई-केवायसी!

E-KYC : सोयाबीन-कापूस अनुदानासाठी घरच्या घरी २ मिनिटांत 'अशी' करा ई-केवायसी!

ई-केवायसी करण्यासाठी ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यकांची मदत घेता येते.तचर घरच्या घऱी मोबाइलवरूनही ई-केवायसी करता येणार आहे. 

ई-केवायसी करण्यासाठी ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यकांची मदत घेता येते.तचर घरच्या घऱी मोबाइलवरूनही ई-केवायसी करता येणार आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Pune : राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रूपयांचे अनुदान राज्य सरकारने जाहीर केले आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे अशाच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पण यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे फार आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यासाठी ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यकांची मदत घेता येते. तर घरच्या घरी मोबाईलवरूनही ई-केवायसी करता येणार आहे. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९६ लाख खातेदारांपैकी ६८ लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिले आहे. त्यातील नमो शेतकरी महानसन्मान निधीत ४७ लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक जुळले आहेत. तर उर्वरित २१ लाखांपैकी २ लाख शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबर अखेर ई-केवायसी केली आहे. उरलेल्या १९ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे.

कोणत्या माध्यमातून करता येते ई-केवायसी?

  • कृषी सहाय्यक
  • ई-सेवा केंद्र
  • प्रत्यक्ष संकेतस्थळावर जाऊन

 

घरच्या घरी कशी करायची ई-केवायसी?

  • https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जाणे
  • त्यानंतर तुम्हाला login  आणि डिस्बसमेंट स्टेटस  हे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला डिस्बसमेंट स्टेटस निवडा
  • त्यानंतर तुम्हाला आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे
  • तुम्हाला केवायसी कोणत्या पद्धतीने करायची आहे ते निवडा
  • त्यानंतर गेट आधार ओटीपी यावर क्लिक करा
  • आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करा
  • म्हणजेच आपली ई-केवायसी पूर्ण झाली असं म्हणता येईल. 
     

Web Title: E-KYC for Soybean Cotton subsidy at home in 2 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.