Lokmat Agro >शेतशिवार > छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

E-KYC of 45 thousand 527 farmers in Chhatrapati Sambhajinagar district is incomplete | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

शेवटची तारीख किती?

शेवटची तारीख किती?

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर मधील 45 हजार 527 पात्र शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. 

केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एकूण बारा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र यासाठी शेतकऱ्याला ई -केवायसी करणे बंधनकारक असून आधार लिंक करणे ही आवश्यक आहे. 

मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील एकूण १२ टक्के शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समजते.  जिल्ह्यात 3 लाख 82 हजार 250 शेतकरी आहेत. 88% शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून 45 हजार 527 शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण आहे. 

शहरातील १०१४ शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण असून वैजापूर तालुक्यात १० हजार २२६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही. खात्याला आधार लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 60 हजार 967 एवढी असल्याचे केवळ वैजापूर तालुक्यातून समोर येत आहे. 

तालुकानिहाय आकडेवारी 


 
25 सप्टेंबर अखेरची मुदत

आता एक केवायसी करण्यासाठी 25 सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून या मुदतीत शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे अन्यथा या दोन्ही योजनेतील अनुदानाला मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते.

Web Title: E-KYC of 45 thousand 527 farmers in Chhatrapati Sambhajinagar district is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.