राज्यातील शेतकऱ्यांनी २०२३-२४ वर्षाकरिता रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीची नोंद करून घेण्याचे आवाहन सर्व तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
१६ ऑक्टोबर २०२३ पासून ई-पीक पाहणी व्हर्जन २ च्या माध्यमातून नोंदीच्या प्रक्रियेत सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाइलमधून आपल्या पिकांची नोंद करून घ्यावी. पीक पाहणीच्या नोंदी करता अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत २०२३-२४ या वर्षाचा पीक पेरा नोंदवून घ्यावा.
नोंद झाल्यानंतर कृषी व फलोत्पादन, आपत्ती नुकसान, पीक विमा, शासकीय आधारभूत किंमत धान्य योजना, खतांवरील सबसिडी या योजनांचा लाभ घेता येतो. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पाहणीची नोंद करावी. अडचण आल्यास संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ई-पीक पाहणी व्हर्जन २ मोबाइल अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://shorturl.at/gjnC2