Join us

E-Pik Pahani : ई-पीक पाहणीसाठी २ दिवस शिल्लक! न केल्यास मिळणार नाही नुकसानीची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 6:51 PM

E-Pik Pahani : राज्य सरकारकडून ई-पीक पाहणी करण्यसाठी ५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती आता संपणार आहे.

Pune : राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून राबवण्यात आलेल्या ई-पीक पाहणीस शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला असून ई-पीक पाहणी करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

दरम्यान, ई पीक पाहणीचा प्रयोग १ ऑगस्टपासून सुरू झाला होता. त्यानंतर दीड महिना शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीच्या अॅपच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली नाही. या अडचणीमुळे यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ झाली होती. २३ सप्टेंबर ही ई-पीक पाहणी करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.

काय आहे ई-पीक पाहणी?शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या पिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर करणे या पद्धतीलाच ई-पीक पाहणी म्हणतात. मागच्या साधारण ४ वर्षांपासून महाराष्ट्रात हा प्रकल्प राबवला जात असून यंदा काही तालुक्यांत प्रयोगिक तत्वावर डिजीटल क्रॉप सर्वे राबवला जात आहे. मोबाईलवर ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करून ई-पीक पाहणी करता येते. शेतात जाऊन आपल्याला लावलेल्या पिकांचे फोटो अपलोड करावे लागतात.

ई-पीक पाहणीचे फायदेई - पीक पाहणी केली तर शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. जर शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात ज्या पिकाचा विमा काढला आहे ते पीक लावलेच नाही असा अर्थ होतो. पीक पाहणी केली नसलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळत नाही. 

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमा