राज्यात खरीप हंगाम सन २०२४-२५ हा दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू करण्यात आला आहे व दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करीता उपलब्ध आहे.
परंतू राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे.
तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार, प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे.
तदनुसार खरीप हंगाम २०२४ करीता ०७ दिवसाची दि. २३.०९.२०२४ पर्यंत शेतकरी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे.
तसेच सहायक/तलाठी स्तरावरील पिक पाहणी मुदत ०७ दिवसाची (दि. २४.०९.२०२४ ते दि. २३.१०.२०२४) मुदतवाढ देण्यात येत आहे.
दिलेल्या मुदतवाढीचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पिक पेरा नोंदवावा असे आवाहन जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडून करण्यात आले आहे.