Lokmat Agro >शेतशिवार > e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

e pik pahani : Read how to do e-pik pahani in detail | e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

e pik pahani : ई-पीक पाहणी कशी करायची वाचा सविस्तर

शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे.

शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतातील हंगामनिहाय घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्या 'सातबारा'वर वस्तुनिष्ठ, अचूक व पारदर्शक नोंद व्हावी याकरिता राज्यात 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यात येणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून, १ ऑगस्टपासून सुरु झालेल्या ई-पीक पाहणीत १५ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या पिकांची अद्ययावत नोंद करू शकणार आहेत.

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या वहीत क्षेत्रावर खरीप हंगामात घेतलेल्या पिकांची 'सातबारा'वर नोंद होत असते. यापूर्वी अशा नोंदी तलाठी करत होते. मात्र, महाराष्ट्र शासनाने याला 'हायटेक' स्वरूप देत यात अधिक अद्ययावतपणा आणला.

यासाठी प्ले स्टोअरवर 'ई-पीक पाहणी' हे अॅप उपलब्ध करून दिले. युजर फ्रेंडली असलेल्या या अॅपला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकांची अक्षांश-रेखांश' आधारित सचित्र नोंद करू लागले आहेत. या नोंदीनुसार तलाठी याची सत्यता पडताळणी करून पीक नोंदी 'सातबारा'वर प्रतिबंधित करत आहेत.

गतवर्षी यात काही त्रुटी होत्या. यात तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकरी यांनी केलेल्या सूचित केल्याप्रमाणे सुधारणा करत नवीन 'ई-पीक पाहणी व्हर्जन टू' हे अॅप यंदा उपलब्ध करून दिले आहे. यामुळे यात अधिक सुविधा, ऑप्शन्स प्राप्त झाले आहेत.

या सुधारणासह अॅप उपलब्ध
एकवेळ दुरुस्ती :
नव्या व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत ४८ तासांत केव्हाही एकवेळ दुरुस्ती करू शकणार आहेत.
एमएसपी नोंद :
शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करावयाची का? असा प्रश्न. त्यानुसार यात संधी आहे.
तीन दुय्यम पिके :
यापूर्वी एक मुख्य व दोन दुय्यम पिके नोंदविता येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणे शक्य आहे.
मदत बटन :
आता शेतकऱ्यांना 'मदत' हे बटन उपलब्ध आहे, यात वारंवार विचारले जाणारे 'एफएक्यू प्रश्न व उत्तरे आहेत.

कोठे कराल नोंदणी?
ई-पीक पाहणी करून आपले पीक आपल्या सातबारावर नोंद करण्यासाठी प्रथम मोबाईलवर 'ई-पीक पाहणी याचे अद्ययावत अॅप डाऊनलोड करायचे. यानंतर पीक क्षेत्रात जाऊन नाव, गाव, गट क्रमांक अशी वैयक्तिक नोंदणी करून पिकांची माहिती अक्षांश-रेखांश यासह सचित्र अपलोड करायची आहे.

यासाठी महत्त्वाची ई-पीक पाहणी
■ शासन राबवत असलेली पीकविमा योजना, पीककर्ज वाटप, नैसर्गिक आपत्ती मदत व शासनाची किमान आधारभूत किंमत योजना यासाठी पीक पेऱ्याची नोंद 'ई-पीक पाहणी' अॅपवर नोंदवणे क्रमप्राप्त आहे.
■ किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अर्थात एमएसपीसाठी नोंद केल्यास सदर पीक माहिती व नोंद आपोआप पुरवठा विभागाकडे परावर्तित होणार आहे.

असे आहे वेळापत्रक.
ई-पीक पाहणी दिनांक १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, शेतकऱ्यांना दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत आपली पिके नोंद करता येणार आहेत. यानंतर १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तलाठी पीक फोटो नसलेले, चुकीच्या फोटो नोंदी, विहीत अंतराबाहेरील फोटो आदी पडताळणी सत्यापत करणार आहेत. यानंतर नोंद गाव नमुना १२ मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

Web Title: e pik pahani : Read how to do e-pik pahani in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.