Join us

E-Pik Survey : ई-पीक पाहणीचे सर्व्हर चालेना अन् उरले फक्त पाच दिवस; शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 9:48 AM

शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. ॲपद्वारे पीकपेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. ई-पीक नोंदणीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसरात यंदा रिमझिम पावसात पिके चांगली बहरली होती. परंतु, दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झालेले आहे. शासनाने अतिवृष्टीची मदत तसेच पीकविमा मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी बंधनकारक केली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

मात्र, ई-पीक पाहणीच्या ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे हस्तपोखरी परिसरातील अनेक शेतकरी पिकांची ऑनलाइन नोंदणी करून शकलेले नाहीत.

उरले फक्त पाच दिवस

ऑनलाइन पीक नोंदणीसाठी फक्त पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंद करायची आहे. परंतु, नेटवर्क आणि ॲपमधील तांत्रिक अडचणी यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ई-पीक नोंदणीची एक महिन्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी हस्तपोखरी येथील रमेश घुले, दत्ता गाढे, प्रभाकर घुगे यांनी केली आहे.

शेतकरी हैराण

● येत्या १५ सप्टेंबरपर्यंत • शेतकऱ्यांना ॲपमध्ये पिकांची नोंदणी करायची आहे. मात्र, मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत.

● महसूल व कृषी विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या सुविधेला नेटवर्कचा मोठा अडथळा येत आहे. ई-पीक पाहणीसाठी शेतकरी प्रत्यक्षात शेतात जाऊन जे पीक पेरले आहे त्याचे लोकेशनसह फोटो काढून माहिती अपलोड करतात.

● परंतु, पोर्टल कधी सुरू, कधी बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे नोंदणीस अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रजालनाशेतकरीशेतीपीकपाऊस