चिकू हे फळ केवळ गोडसर चवेसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. या फळात भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये असतात, जी शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
चिकू हे फळ नियमितपणे खाल्ल्यास आपल्या शरीराला विविध प्रकारचे फायदे होतात. तसेच जाणून घेऊया चिकूच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी अधिकची सविस्तर माहिती.
उर्जा निर्माण करते
चिकूमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते, त्यामुळे हे फळ शरीराला आवश्यक असलेली उर्जा पुरवते. विशेषतः व्यायामानंतर किंवा थकवा आल्यावर हे फळ खाणे फायदेशीर ठरते.
हाडे मजबूत करते
चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि रक्तवाढीस मदत होते. ह्या पोषणद्रव्यांमुळे शरीराची अस्थिमज्जा स्वस्थ राहते.
डोळ्यांच्या विकारात उपयुक्त
चिकूमध्ये जीवनसत्व 'अ' भरपूर असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे डोळ्यांची कमजोरी किंवा विकार असल्यास चिकू खाणे फायदेशीर ठरते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
चिकूमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण देतात.
केसांसाठी फायदेशीर
चिकूचे संपूर्ण फळ आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असतात, जे केस गळणे आणि डोक्याची समस्या कमी करण्यास मदत करतात.
हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण
चिकूमध्ये पित्तनाशक गुणधर्म असतात. जेवणानंतर हे फळ खाल्ल्याने हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण मिळते आणि पचनक्रिया सुधरते.
श्वसनातील अडथळे दूर करते
चिकू कफ आणि श्वासनलिकेतील अडथळे दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे सर्दी-जुखाम झाले असल्यास हे फळ खाणे उपयुक्त ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर
चिकूमध्ये असलेले ई जीवनसत्व त्वचेसाठी खूप चांगले आहे. हे त्वचेचा पोत सुधारते, तेजस्वीपणा आणते आणि त्वचा मऊ व गुळगुळीत ठेवते.
हेही वाचा : शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा 'ही' प्रक्रिया; उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता