मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. मत्स व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव या पदावर बदली करण्यात आली.
रिचा बागला यांची बदली वित्त विभागाच्या प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. अंशू सिन्हा वस्त्रोद्योग, सहकार, पणन विभागाच्या नवीन प्रधान सचिव असतील.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे प्रधान सचिव असतील. वित्त विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. हे कृषी विभागाचे नवे सचिव असतील.
अधिकाऱ्याचे नाव | सध्याचे पद | बदलीनंतरचे पद |
अतुल पाटणे | आयुक्त, मत्सव्यवसाय | सचिव पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य |
रिचा बागला | नियुक्तीच्या प्रतीक्षेत | प्रधान सचिव वित्त |
अंशू सिन्हा | नियुक्त्तीच्या प्रतीक्षेत | प्रधान सचिव वस्त्रोद्योग, सहकार, पणन |
नवीन सोना | प्रधान सचिव, सा. आरोग्य | उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रधान सचिव |
डॉ. रामास्वामी एन. | सचिव, वित्त | सचिव कृषी, पशुसंवर्धन |
वीरेंद्र सिंग | सचिव वस्रोद्योग | सचिव सा. आरोग्य |
प्रदीप पी. | नियुक्तीच्या प्रतीक्षेत | सीईओ, मेरिटाईम बोर्ड |
माणिक गुरसाळ | सीईओ, मेरिटाईम बोर्ड | सीईओ, नाशिक विकास प्राधिकरण |