Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

Eight sugar mills in the state paid installments higher than FRP | राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे.

गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. त्या आठ कारखान्यांनी आरएसएफच्या (रेव्ह्युन्यू शेअरिंग फॉर्म्युला-उत्पन्न वाटप सूत्र) प्रक्रियेत गुरफटून शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याऐवजी ताळेबंद पत्रकात नफा दिसल्यानंतर ते वाटप करणे पसंत केले आहे.

यामुळे आठ कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन अधिकाधिक ५६४ ते कमीत कमी १२१ रुपये उत्पादकांना दिवाळीपूर्वीच मिळाले आहेत. दसरा, याउलट कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी मागणी करून आंदोलन करूनही पैसे देण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याचे समोर आले आहे.

तर प्रतिटन ४०० रुपये मिळतील
एफआरपीची रक्कम देऊन शिल्लक राहिलेल्या पैशापैकी ७० टक्के ऊस उत्पादकांना आणि ३० टक्के कारखाना व्यवस्थापनासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. यासाठी ताळेबंद अंतिम झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे मान्यतेसाठी पाठवला जातो. तेथून साखर आयुक्ताकडे जातो. त्यांच्याकडून अंतिम मंजुरीसाठी ऊस दर नियंत्रण समितीकडे जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आम्ही ४०० रुपये देऊ शकत नाहीत, असे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. याउलट हे काहीही न करता ताळेबंद अंतिम झाल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील आठ कारखान्यांनी दुसरा हप्ता उत्पादकांना देऊन टाकला आहे. यांची कार्यपद्धती अवलंबली तर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्पादकांनाही प्रतिटन ४०० रुपये मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

दृष्टिक्षेपातील साखर उद्योग
एकूण साखर कारखाने - २००
एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले कारखाने - ८ 
सरासरी दैनिक गाळप क्षमता - ८,०१,३०० मेट्रिक टन

एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिलेले कारखाने
माळेगाव (ता. बारामती) - ५६४
सोमेश्वर (ता. बारामती) - ४९६
विघ्नहर (ता. जुन्नर) - ३२८
प्रसाद शुगर्स (ता. राहुरी) - १७७
पद्मश्री विखे-पाटील (ता. राहाता) - ३५६
सहकार महर्षी थोरात (ता. संगमनेर) - १२१
गणेश सहकारी (ता. राहाता) - ४०७
शंकरराव कोल्हे (ता. कोपरगाव) - २५२

माळेगाव, सोमेश्वर साखर कारखाने प्रत्येक वर्षी टनाला पैसे देण्यात शंभर ते दीडशे रुपयांनी कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा मागे असतात. यावेळी त्यांनी एफआरपीशिवाय दुसरा हप्ता म्हणून चारशेपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. याचा अर्थ साखर कारखानदाराकडे पैसे आहेत; पण कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार ते द्यायला तयार नाहीत; पण आम्ही हिसकावून ऊस उत्पादकांच्या पदरात टाकणार आहे. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Eight sugar mills in the state paid installments higher than FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.