ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल आकारले जाते. ग्राहकांना दरमहा वीजबिल देण्यात येत असले तरी नियमित वीजबिल भरणारे ग्राहक मोजकेच आहेत. तत्पर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून सवलत दिली जाते, तर मुदतीनंतर बिल भरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो. दंड भरण्यापेक्षा ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दरमहा ग्राहकांनी वापरलेल्या युनिटनुसार वीजबिल देयके ग्राहकांना दिली जातात. ग्राहकांनी वेळेवर वीजदेयके भरल्यास वीज खरेदीसह, कर्मचारी वेतन, देखभाल दुरुस्ती खर्च व अन्य खर्च महावितरणला भागवावे लागतात. वीज खरेदीसाठी संबंधित कंपन्यांना वेळेवर पैस न दिल्यास महावितरणला दंड, व्याजाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे महावितरणने दिलेली वीज देयके वेळेवर भरणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो आपल्यालाही सवलत हवी असेल तर वीजबिल तत्पर भरा.
काही ग्राहक गो ग्रीन सेवेचा लाभ घेत ऑनलाइन वीजबिल स्वीकारून ऑनलाइन भरणा करून सवलतीचा लाभ मिळवितात. काही ग्राहक नियमित वीज देयके भरतात. मात्र, काही ग्राहक वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने वीजबिलाच्या रकमेसह दंडाची रक्कम भरावी लागते.
'गो ग्रीन'चा फायदा
काही ग्राहक दरमहा छापील वीज बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल स्वीकारून गो ग्रीन सेवेचा लाभ घेत आहेत. दरमहा दहा रुपयांप्रमाणे वार्षिक १२० रुपये आर्थिक सवलत ग्राहकांना मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ५.४४१ ग्राहक गो ग्रीन सेवेचा लाभ घेत आहेत.
दोन महिन्यांचे बिल थकलं, तर तोडली जाते वीज
घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास महावितरणकडून नोटीस दिली जाते. नंतर खंडितची कारवाई होते.
१५ दिवसांची मुदत
घरगुती ग्राहक वगळता अन्य ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाते. वेळेवर वीजबिल न भरल्यास नोटीस देऊन वीज खंडित करण्याची कारवाई केली जाते.
मुदतीनंतर बिल भरल्यास दंड
- ग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास प्रत्येक बिलासाठी एक टक्का सवलत मिळते.
- ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना ०.२५ टक्के सवलत दिली जाते.
- मुदतीनंतर बिल भरल्यास सव्वा टक्के दंड आकारला जातो.
महावितरणकडून नियमित वेळेत वीजबिल भरणायांना सवलत दिली जाते. अनेक ग्राहक ऑनलाइन, गो ग्रीन सवलतीचा लाभ घेत आहेत. वीजबिल थकल्यास सुरुवातीला ग्राहकांना वीजबिल भरण्याची नोटीस दिली जाते, तरीही वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे वेळेवर वीजबिले भरून ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे. - स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता