Join us

कृषी क्षेत्राचा विजेचा वापर मागील दहा वर्षात ३७.१ टक्क्यांवर

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 28, 2024 4:15 PM

२०१९-२० मध्ये एकूण ऊर्जा वापराच्या ३७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे असे ऊर्जा संशोधन संस्थेच्या इयरबुकमध्ये सांगण्यात आले आहे.

भारतातील कृषी क्षेत्रातील थेट ऊर्जेचा वापर २०१९-२० मध्ये एकूण ऊर्जा वापराच्या ३७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे असे ऊर्जा संशोधन संस्थेच्या इयरबुकमध्ये सांगण्यात आले आहे.

भारतीय शेतीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे. अप्रत्यक्ष म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस असणारी खते आणि कीटकनाशके आणि अप्रत्यक्ष म्हणजे वीज आणि इंधनाचा वापर वाढला आहे. २००९- १० मध्ये कृषी क्षेत्राचा ऊर्जेचा वाटा २८.७५ टक्के एवढा होता. तो आता ३७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

नवीन पीक वाणांसाठी सिंचनाची उच्च मागणी आणि या क्षेत्राला अनुदानित वीज पुरवल्यामुळे कृषी क्षेत्रात विजेचा वापर वाढत आहे असे त्यात म्हटले आहे. भारतीय शेतीमध्ये हवामान संबंधित होणाऱ्या दरवर्षीच्या नुकसान यंदा ४.९ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.खतांच्या स्वरूपात ऊर्जेचा अप्रत्यक्ष वापर 2009-10 मध्ये 68.4 टक्के होता. परंतु 2019-20 मध्ये तो 60.61 टक्के झाला.

टॅग्स :वीजशेतकरीशेती क्षेत्र